Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister : राज्याचे नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?

Cabinet Portfolio Allocation : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून शनिवारी खातेवाटपही झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : शनिवारी (ता.२१) अखेर खातेवाटप झाले असून कृषिमंत्रीपदाची माळ माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पडली आहे. राज्याला नवे कृषीमंत्री मिळाले आहेत. मात्र नव्या कषिमंत्र्यांना शेतकरी आणि शेतीचे विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. कृषी मंत्रालय धनंजय मुंडे यांच्या ऐवजी कोकाटे यांना देण्यात आले आहे.

महायुतीचे सरकार येऊन आता एक महिना होणार आहे. तर हिवाळी अधिवेशनही संपले आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा एकदेखील निर्णय झालेला नाही. उलट राज्यात कापूस आणि कांद्याच्या भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील सोयाबीनला भाव मिळत नसल्याचे चिंतेत आले आहे. अशात आता नवे कृषिमंत्री शेतीच्या प्रश्नांकडे कसे पाहात ते पाहावं लागणार आहे.

शेतकरी कर्जमाफी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने शेतकऱ्यांसाठी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावेळी महायुतीचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे शेतकरी कर्जमाफीचे सूप कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या काळात वाजणार का? ते कर्जमाफीचे शिवधनुष्य पेलणार का हे पाहावं लागणार आहे.

कापसाने केल्या अपेक्षाभंग

तीन वर्षांपूर्वी कापसाला ८५०० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र तो यंदा ६ हजाराच्या बाहेर देखील गेलेला नाही. कापसाला उत्पादन खर्चा इतकादेखील भाव मिळताना दिसत नाही. तर मजुरी खर्च देखील वाढला आहे. त्यातच गुलाबी बोंड अळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले असून कापसाला दर मिळत नाही. यामुळे कापसाला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे.

सोयाबीनचे भाव पडले

तसेच सोयाबीनचे देखील भाव पडले असून ते हमीभावाच्या खालीच आहेत. यामुळे सोयाबीन शेतकरी अडणीच आला असून सोयाबीनला हेक्टरी १० हजारांची मदतीची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत.

दूध दराचा प्रश्न

तर पश्चिम महाराष्ट्रात गायीच्या दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. यावरून येथे शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना गेली वर्षभर गायीच्या दूध दरात सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कांद्याला हमीभावाची मागणी

राज्यात कांद्याचे भाव देखील उतरले असून कांदा उत्पादक शेतकरी संतापला आहे. यावरून शेतकऱ्यांनी लासलगावसह सोलापूर बाजार उत्पन्न समितीत कांदा लिलाव बंद पाडून रोष व्यक्त केला आहे. तर कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत घोटाळा

दरम्यान हिवाळी अधिवेशनात पीकवमा घोटाळा बाहेर पडला आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत बीड आणि परभणी जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टरवरील बोगस पीकविमा उघडकीस आला आहे. तर यामध्ये परळी तालुक्यातील अनेकांची नावे असल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच धस यांनी माजी कृषिमंत्री धनंजय मुडे यांचे नाव घेणे टाळणे असून हा घोटाळा २०२३-२४ या काळातील असल्याचा आरोप केला आहे. फळबागायतदार यांचेही अनेक प्रश्न असून द्राक्ष उत्पादकांची व्यथा आमदार रोहीत पाटील यांनी अधिवेशनात मांडली आहे.

अशाप्रकारे नवे कृषिमंत्री कोकाटे यांच्यासमोर शेतीशी निगडीत अनेक प्रश्न उभे असून ते यातून कसा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. तर ते राज्यातील शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत कोकाटे?

माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) सिन्नरचे आमदार आहेत. यंदाची टर्म त्यांची सहावी असून ते पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. तर पहिल्यांदाच त्यांना कृषि खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकाटे यांची ओळख नाशिक जिल्ह्यातील दूरदृष्टीचा नेता अशी आहे. याआधी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी साडेतेरा हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर करून आणला. त्यांनी आमदार होण्याआधी नाशिक जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

कृषी क्षेत्राशी निगडीत महत्वाची खाती

संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास),

गणेश नाईक – वन

कृषी क्षेत्राशी निगडीत महत्वाची खाती

अतुल सावे – दुग्धविकास मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

संजय सावकारे – कापड

भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT