Maharashtra Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे राज्याचे नवे कृषिमंत्री; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं, संपूर्ण यादी!

Agriculture Minister : नव्या सरकारमध्ये मात्र कृषी खातं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Manikrao Kokate
Manikrao Kokate Agrowon
Published on
Updated on

राज्यातील महायुती सरकारने विधिमंडळ अधिवेशन संपताच शनिवारी (ता.२१) खातेवाटप जाहीर केली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले, परंतु तरीही खातेवाटप न झाल्याने चर्चेला उधाण आलं होतं. अखेर मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. मागील सरकारप्रमाणेच या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आलं आहे. परंतु नव्या सरकारमध्ये मात्र कृषी खातं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या सरकारमध्ये गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तसेच गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे.

मागच्या सरकारमध्ये महसूलमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) देण्यात आलं आहे. तर नव्या सरकारमध्ये महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, अतुल सावे यांना दुग्धविकास, पंकजा मुंडे यांच्याकडे पशुसंवर्धन, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज, गणेश नाईक वन, गिरीश महाजन यांना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) खात्याची जबाबदारी दिली आहे. तर महिला व बालविकास अदिती तटकरे, तसेच रोजगार व फलोत्पादन खातं भरत गोगावले यांच्या सोपविण्यात आलं आहे.

Manikrao Kokate
Farmer Loan waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; विधीमंडळात वड्डेटीवार, लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कॅबिनेट मंत्री कोण?

१.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

२.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

३.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

४.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

५.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास)

६.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

७. गणेश नाईक - वन

८. दादा भुसे - शालेय शिक्षण

९. संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

१०. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

११ .मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

१२ .उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

१३. जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

१४ .पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

१५ .अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 

१६ .अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

१७ .शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

१८.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

१९ .दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

२०.अदिती तटकरे - महिला व बालविकास

२१ .शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

२२ .माणिकराव कोकाटे - कृषी 

२३ .जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

२४.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

२५ .संजय सावकारे - कापड

२६ .संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

२७.प्रताप सरनाईक - वाहतूक 

२८.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

२९.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

३०.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे

३१ .आकाश फुंडकर - कामगार 

३२.बाबासाहेब पाटील - सहकार 

३३.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री कोण?

१. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

२. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

३. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

४. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन 

५. योगेश कदम - गृहराज्य शहर

६. पंकज भोयर - गृहनिर्माण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com