Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping : मधाचा ‘मधुबन’ ब्रॅण्ड जगात पोहचला पाहिजे

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ‘‘राज्यात मधपाळांसमोर अनेक समस्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन त्या सोडविल्या पाहिजेत. सरकार आपल्या परीने त्या सोडविण्यासाठी काम करत आहे. या उद्योगात रोजगार निर्मितीच्या मोठ्या संधी आहेत. मधाचे उत्पादन घेऊन तयार केलेला ‘मधुबन’ हा ब्रॅण्ड जगात पोहचविणे हे आमचे स्वप्न आहे,’’ असे मत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.

जागतिक मधमाशा पालन दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने २०२३-२४ या वर्षातील ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ या पुरस्कारांचे वितरण पुण्यात मंगळवारी (ता.२५) झाले. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, मध संचालनालयाचे संचालक रघुनाथ नारायणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, एन. जी. पाटील आदी उपस्थित होते.

अकोले (नगर) तालुक्यातील अंबड येथील राजू कानवडे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ११ हजार रुपये देऊन प्रथम मधुमित्र पुरस्कार देण्यात आला. भद्रावती (चंद्रपूर) मधील पिर्ली येथील दत्तू खेरगुडे यांना द्वितीय मधुमित्र पुरस्कार, तर दर्यापूर (अमरावती) माकेंडा येथील योगिता इंगळे यांना तृतीय मधुसखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. साठे म्हणाले,‘‘शासनाने स्वतंत्र मध संचालनालय केले आहे. दुष्काळी भागातही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. गावागावात मधाच्या पेट्या पोहचल्या पाहिजेत. सध्या आपण आठ ते दहा टक्के मधाचे उत्पादन घेतो. त्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण नाही, मार्गदर्शन नाही.

सरकारच्या सर्व विभागाने एकत्र येऊन मधमाशांवर काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तशी मागणी केली आहे. इस्राईल सारख्या देशात तीन ते चार लाख पेट्या आहेत. तर महाराष्ट्रात अवघ्या ४५ ते ५० हजार पेट्या आहेत. सध्या राज्यातील मधमाशा पालकांची सूची नाही. त्यासाठी मोहीम हाती घेऊन त्यांची नोंदणी केली पाहिजे.’’

विमला म्हणाल्या, ‘‘मधमाशीपालन हा फक्त व्यवसायच नाही, तर पर्यावरण, शेतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. खादी ग्रामोद्योग विभाग फक्त मधमाशीपालन करत नाही, तर कागद प्रक्रिया उद्योग करत आहे. याशिवाय इतर उद्योगांना मदत करण्याचे काम करत आहे.’’ बिपिन जगताप यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार डांगर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT