Beekeeping : मधमाशीपालन व्यवसायातून पर्यटनाला चालना मिळाल्याचे सिद्ध

Beekeeping Business : निसर्गाचा लहरीपणा तसेच ग्लोबल वॉर्मिंग अशा संकटांमुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे. पिकविण्याची बुद्धि त्याच्याकडे आहे; पण विकण्याचे ज्ञान मात्र नाही.
Beekeeping
Beekeeping Agrowon
Published on
Updated on

Nashik News : निसर्गाचा लहरीपणा तसेच ग्लोबल वॉर्मिंग अशा संकटांमुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे. पिकविण्याची बुद्धि त्याच्याकडे आहे; पण विकण्याचे ज्ञान मात्र नाही. म्हणूनच ग्रामीण भागात शेतीमाल प्रक्रिया उद्योग सुरू होणे ही काळाची गरज आहे.

त्याचबरोबर मधमाशीपालन व्यवसाय हा पर्यटन उद्योगाला चालना देऊ शकतो, हे पिंपळगाव बसवंत येथील मधमाशी प्रशिक्षण केंद्राने सिद्ध केले, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

पिंपळगाव (बसवंत) येथील ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि.’ संचलित बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्राच्या वतीने १ ते १० ऑगस्ट दरम्यान आयोजित राज्यस्तरीय प्राचार्य- मुख्याध्यापक परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी ॲड. ठाकरे बोलत होते.

Beekeeping
Beekeeping : महिला शेतकऱ्यांचा मधमाशी पालनासाठी राज्यांतर्गत अभ्यास दौरा

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद रसाळ प्रमुख पाहुणे होते. तसेच डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड, कल्पेश गोसावी, प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाल्या, की शेतीपूरक पर्यावरण निर्माण करून आणि निसर्गाशी मैत्री करून त्याचे संवर्धन कसे करता येईल याचे छान प्रात्यक्षिक बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्राद्वारे विविध उपक्रमांतून दाखवले जात आहे.

Beekeeping
Beekeeping : मधमाश्यांकडून शिकूया काही ‘मॅनेजमेंट टिप्स’

या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी मधमाशीपालन व्यवसायाला नव्यादृष्टीने नवीन परिमाण देऊन संजय पवार यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. येथे विद्यार्थी सहली आयोजित करून त्यांना ज्ञान आणि त्याबरोबरच मनोरंजनाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापकांना केले.

मधमाशी उद्यान-मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्रातून मधु-उद्योजकतेचे तसेच त्या अनुषंगाने निसर्गस्नेही अशा प्रकल्प व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन केले जाते.

रूढ शालेय शिक्षणाची धुरा वाहणाऱ्या प्राचार्य-मुख्याध्यापकांच्या सहभागातून हे कार्य अधिक व्यापक आणि विद्यार्थीकेंद्री करण्याचे उद्दिष्ट या परिषदेच्या आयोजनामागे आहे, असे पूर्वा केमटेक प्रा. लि.चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’चे तांत्रिक संचालक डॉ. भास्कर गायकवाड, विजय पवार, महेश पाटील, संदीप वाघ, संदीप सोनवणे, नितीन कराळे आदींसह राज्यातील अनेक प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते. १० ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या परिषदेत प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com