Beekeeping : मधमाशी संवर्धनासाठी जैविक कीडनाशके वापरा

Vishal Chaudhari : मधमाशी संवर्धनासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा. तसेच मधमाश्यांसाठी हानिकारक असणारी कीडनाशके फवारणी टाळावी.
Beekeeping
BeekeepingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मधमाशी संवर्धनासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा. तसेच मधमाश्यांसाठी हानिकारक असणारी कीडनाशके फवारणी टाळावी. त्यामुळे मधमाशीवर दुष्परिणाम होणार नाहीत. पर्यावरणात मधमाश्यांचे अस्तित्व टिकून राहील, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, मालेगावचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ विशाल चौधरी यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे मधमाशी पालन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी चौधरी यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. या वेळी मधमाशी पेटी प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.

Beekeeping
Beekeeping Workshop : मधमाशी पालनावर राष्ट्रीय कार्यशाळा

डॉ. चौधरी म्हणाले, की दिवसेंदिवस डाळिंब पिकामध्ये परागीभवनासाठी मधमशीची कमतरता ही समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी पिकामध्ये फुळगळीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. शेतकरी फूलगळ थांबविण्यासाठी फवारण्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

यावर पर्याय म्हणून मधमाशी पेट्यांचा वापर करावा. डाळिंबाचे उत्पादन वाढीसाठी, फळांमध्ये आकर्षित रंग, फुलांचे फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मधमाशीद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे महत्त्व सांगितले.

Beekeeping
Beekeeping : सातेरी मधमाशी पालनाचा जडला लळा

पेट्या प्रात्यक्षिकसाठी वडेल व दाभाडी गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी प्रास्ताविक केले. कृषीविद्या विषय विशेषज्ञ रूपेश खेडकर यांनी मधमाशी पालनाचे महत्त्व सांगितले.

प्रात्यक्षिकवेळी मधमाश्यांची ओळख, मधपेटीची हाताळणी कशी करावी व मधमाशीच्या शत्रूंपासून संरक्षण करण्याची पद्धत दाखविण्यात आली. तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी डाळिंब पिकामध्ये परागीभवनाचे महत्त्व सांगितले. मधुमक्षिका पेटीचे वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com