Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

Supriya Sule Letter: पुण्यात ‘लम्पी स्किन'चा प्रादुर्भाव वाढत असून पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

Roshan Talape

Pune News: राज्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये 'लंम्पी स्कीन' या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. पुणे शहरातील वारजे परिसरातील गोकुळनगर पठार आणि वारजे माळवाडी या  भागात आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, स्थानिक पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. १७) पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहून तातडीची दखल घेण्याची मागणी केली आहे.

या आजारात जनावरांच्या शरीरावर गाठी निर्माण होतात, सूज येते आणि तापही येतो. या लक्षणांमुळे शेतकरी आणि गोपालक चिंतेत आहेत, कारण हा आजार अतिशय वेगाने पसरतो. यावर खासदार सुळे यांनी प्रशासनाला पत्रातून विनंती केली आहे की, बाधित भागात त्वरीत पशुवैद्यकीय पथके पाठवावीत. तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण, फवारणी आणि अन्य उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

राज्यात २०२० आणि २०२२ मध्ये या आजाराने मोठे थैमान घातले होते. आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातून जनावरांना लक्षणे दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच जनावरांमध्ये गाठी, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणे शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर निदर्शनास आणून दिली आहेत.

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, पशूसंवर्धन विभागाकडे या आजाराचा अद्यापपर्यंत एकही अधिकृत प्रयोगशाळा अहवाल आलेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणा ही परिस्थिती गांभीर्याने घेत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा आजार वेळेवर रोखला नाही, तर राज्यातील पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पुणे महापालिकेसह राज्य प्रशासनाने तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाकडे मागण्या:

  • बाधित भागात तातडीने पशुवैद्यकीय पथके पाठवावीत.

  • जनावरांवर प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

  • रोगप्रसार थांबवण्यासाठी फवारणी करावी.

  • संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT