Jalgaon News : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी या महिन्याच्या सुरवातीपासून सुरू आहे. पण यास खरिपाच्या सुरुवातीसही कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच अॅप सर्व्हर डाउनमुळे कार्यरत होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी ई-पीक पाहणीदेखील फारशी होत नसल्याची स्थिती आहे. अद्याप ३० टक्केच क्षेत्रात पेरणी झाल्याचे ई-पीकपाहणीत दिसत आहे.
सध्या केळी लागवड सुरू आहे. पूर्वहंगामी कापूस व अन्य खरिपातील पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. परंतु या लागवडीच्या नोंदी ऑनलाइन किंवा सात-बारावर दिसत नसल्याची स्थिती आहे. ई-पीकपाहणी अॅण्ड्रॉइड मोबाइलच्या मदतीने ई-पीकपाहणी अॅपवरून करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करताना नेटवर्क, डाटा हवा असतो.
स्मार्ट फोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड केले आहे. त्यांचा खाते क्रमांक व चार अंकी संकेतांक आहे. या खाते क्रमांक व संकेतांकाची नोंद केल्यानंतर अॅप सुरू होते. पुढे पीक पाहणीसंबंधी कार्यवाही होते.
परंतु अॅप संकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशाही तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलााठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवित आहेत. यासंबंधीची कार्यवाही प्रशासनातील संबंधित करू शकतात. परंतु दुरुस्तीच होत नसल्याने पीक पाहणीची नोंद अॅपवर होत नसल्याची स्थिती आहे. रब्बी हंगाम निम्मा पूर्ण झाला आहे.
खरिपातील पेरणी सुरू झाली आहे. काहींनी पेरणी नोंदविली, परंतु पेरा नोंद अद्याप उताऱ्यावर दिसत नाही, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाची मदत पेरणीसंबंधीच्या आकड्यांबाबत महसूल प्रशासनास घ्यावी लागत आहे. ई-पीक पाहणीसंबंधीचे काम महाआयटीच्या पुणे येथील कार्यालयातून हाताळले जाते. यातच कुठेही ई-पीक पाहणीसंबंधी अधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.