Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : सोयाबीन, तुरीत बियाणे बदलाचे प्रमाण कमी

Seed Replacement : नवीन वाणांच्या बियाण्यांचा वापर करून उत्पादन अधिक घेण्याचे तज्ज्ञ आवाहन करतात. मात्र खरिपात वापरल्या जाणाऱ्या बियाणे बदलाचे प्रमाण तूर, सोयाबीनमध्ये कमीच आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नवीन वाणांच्या बियाण्यांचा वापर करून उत्पादन अधिक घेण्याचे तज्ज्ञ आवाहन करतात. मात्र खरिपात वापरल्या जाणाऱ्या बियाणे बदलाचे प्रमाण तूर, सोयाबीनमध्ये कमीच आहे. बाजरी, मक्यात मात्र शंभर टक्के दरवर्षी बियाणे बदल होतो. मुगातही तुलनेने बियाणे बदलाचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

राज्यात खरिपात साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, भात, तूर, मक्याची पेरणी तर कापसाची लागवड करतात. राज्यात खरिपाचे यंदा १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कापसाचे ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर, तर सोयाबीनचे ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर क्षेत्र निश्‍चित केले आहे.

एकेकाळी खरिपात बाजरी अनेक जिल्ह्यांत प्रमुख पीक होते. आता मात्र बाजरीचे क्षेत्र घटत असून यंदा ६ लाख ६० हजार ०८९ हेक्टर सरासरी निश्‍चित केले आहे. यंदा चांगल्या पावसाचे संकेत असून पेरणी लागवड क्षेत्रात वाढही होऊ शकते.

मागील तीन वर्षांच्या बियाणे विक्रीवर बियाणे बदलाचे प्रमाण कृषी विभाग निश्‍चित करतो आणि त्यानुसार त्या त्या पिकांच्या बियाण्यांची मागणी केली जाते. कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार बियाणे बदलात सर्वांत कमी बदल तुरीत होत असून, अनेक शेतकरी जुने आणि पारंपरिक बियाणे वापरतात. सोयाबीनचे, मुगाचे बियाणेही जुने वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार असल्याचे दिसून येत आहे.

पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांनी संशोधित केलेल्या वाणांचा वापर होत असला, तरी गतवर्षी घेतलेले उत्पादनातीलच बियाणे म्हणून वापर होत आहे. त्यावरुन बियाणे बदल ठरवला जातो. मका आणि बाजरीत मात्र शेतकरी दरवर्षी नवीन बियाणे घेतात. जुने बियाणे वापरताना बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणीवर बहुतांश शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

बियाणे बदलाचे प्रमाण (टक्के)

भात ः ३२

बाजरी ः १००

मका ः १००

तूर ः १०

मूग ः २२

उडीद ः ६१

सोयाबीन ः २५

कापूस ः ७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT