Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

Heavy Rain : भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानुसार जिल्ह्यात २० तारखेपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर वाढला.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सलग सात दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक होत आहे. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. बुधवारी (ता. २५) जिल्ह्यात चांडोळा व मुदखेड मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत सरासरी १३.१० मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानुसार जिल्ह्यात २० तारखेपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. हा पाऊस धर्माबाद, अर्धापूर, लोहा, हदगाव, नांदेड व मुदखेड तालुक्यात झाला होता.

पावसाने प्रमाण अधिक असल्याने धर्माबाद तालुक्यातील सिरजखेड मंडलात ७४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा झोडपून काढले. सततच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान बुधवारचा पाऊस मुखेड तालुक्यातील चांडोळा मंडलात ८४.८० मिलिमीटर तर मुदखेड मंडलात ७१ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १३.१० मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ८६५.२० मिलीमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ९७.१३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मंडलनिहाय झालेला पाऊस

रामतीर्थ मंडलात ४८ मिलिमीटर, जाहूर २४, आंबुलगा ३७.८, पेठवडज २२.५, बारुळ २२.५, तामसा २६.५, आष्टी २६.५, भोकर २९, इस्लापूर ५७.५, दहेली ६३.५, जलधारा २४, सिंदगी २७.३, उमरी बाजार ३९.३०, मुगट २३.८, बारड २७.५, हिमायतनगर ३६.८, जवळगाव ३६.८, सिंदखेड ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT