Shrikant Kuvlekar Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loss : सदोष बाजार व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Shrikant Kuvalekar : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा पोहोचवायचा असेल तर आधुनिक पणन व्यवस्था तसेच वायदे बाजाराचे स्वतंत्र मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वायदे बाजारतज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी केले.

Team Agrowon

Nagpur News : सध्याच्या शेतमाल बाजार व्यवस्थेत अनेक दोष आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा पोहोचवायचा असेल तर आधुनिक पणन व्यवस्था तसेच वायदे बाजाराचे स्वतंत्र मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वायदे बाजारतज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी केले.

विदर्भ ॲग्रिकल्चर ॲण्ड अलाई प्रोड्युसर कंपनी (व्यापको) तसेच विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) यांच्या संयुक्‍त सहकार्याने व्यापकोच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

वनामती सभागृहात रविवारी (ता.५) झालेल्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांची उपस्थिती होती. पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. विकास महात्मे, रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे, तर विशेष मार्गदर्शक म्हणून शून्य मशागत तंत्रज्ञानाचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांची उपस्थिती होती.

श्री. कुवळेकर म्हणाले, की ‘‘वायदे बाजाराच्या माध्यमातून आधीच दर जाहीर होतात. परिणामी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीविषयी व त्यातही लागवड क्षेत्र किती असावे याबाबतचा निर्णय घेणे शक्‍य होते. सध्याच्या स्थितीत पेरणीच्यावेळी दर अधिक राहतात आणि बाजारात आवक होणार असेल त्यावेळी कमी होतात, असा ट्रेंड बाजारात अनुभवला जातो. त्यामुळेच फ्युचर मार्केट (वायदे बाजार) प्रभावी ठरतो. किंमत जोखीम व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योगासाठी कच्चा मालाचा विना अडथळा पुरवठा, केंद्र व राज्य सरकारचे जोखीम व्यवस्थापन असे अनेक फायदे यातून साधता येतात.

मात्र दुर्दैवाने वायदे बाजारातील व्यवहारावर बंदी लादत शेतकऱ्यांना या व्यवस्थेपासून वंचित ठेवले जात आहे. सध्या केवळ कापूस आणि हळद या दोन पिकांतच वायदा सुरू आहे. या दोन्ही पीक उत्पादकांनी त्यातूनच चांगला फायदा मिळविला आहे.’’ चंद्रशेखर भडसावळे यांनी शून्य मशागत तंत्रज्ञान, त्याची उपयोगिता, त्यातून होणारे फायदे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी व्यापकोचे राजेश उरकुडे यांच्यासह संचालक, भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक गाव, एक वाण पद्धत अंगीकारा

प्रक्रिया उद्योजकांकडून क्‍लिनिंग, ग्रेडिंग केलेला आणि शक्‍यतो एकच वाण असलेल्या शेतमालाला मागणी राहते. त्यामुळे गावस्तरावर एकत्रितपणे ‘एक गाव, एक वाण’ लागवडीचा निर्णय झाला तर खरेदीदार आपसूक गावापर्यंत येतील, त्यामुळे गावातूनच शेतमालाची उचल होत चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याचा सल्ला आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT