Bamboo Cultivation : गट शेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करा

Group Farming : पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे, म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

Satara News : पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे, म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबूपासून अनेक उत्पादने घेता येतात. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरे (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शनिवारी (ता.४) हस्ते बांबू लागवड करण्यात आली. या वेळी कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde
Bamboo Farming : सरकार बांबू लागवडीसाठी देतयं अनुदान!

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोड धंदा मिळवा, म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ऊस लागवडीमधून साधारणतः हेक्टरी उत्पादन शंभर टन व प्रतिटन किमान अडीच हजार रुपये भाव मिळतो.

Eknath Shinde
Bamboo Planting : शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावे : संदीपान भुमरे

बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन शंभर टन मिळते. त्याला प्रतिटन किमान चार हजार रुपये भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. रोजगार मिळावा, यासाठी बांबूपासून उत्पादन करणारा उद्योग उभारण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरी भागातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शहरात बांबू पार्क उभारण्यात येणार आहे.’’ या वेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com