Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ५० हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान

Post Monsoon Crop Damage : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा कपाशी व तूर या पिकांना जोरदार फटका बसला आहे.

Team Agrowon

Parbhani News : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा कपाशी व तूर या पिकांना जोरदार फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील ३३ हजार २२६ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार २८३ हेक्टर असे दोन जिल्ह्यातील मिळून एकूण ५० हजार ५०९ हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

तसेच परभणी जिल्ह्यातील १२ हजार ५१५ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २१ हजार ४५७ हेक्टर मिळून एकूण हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात २०२३ मधील नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील २३ मंडलांत अतिवृष्टी झाली.

इतरही मंडलांत जोरदार पाऊस झाला. खरीप व रब्बीतील मिळून एकूण ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात कपाशीचे बाधित क्षेत्र ३३ हजार २२६ हेक्टर व तुरीचे बाधित क्षेत्र १२ हजार ५१५ हेक्टर आहे आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली, तसेच इतरही मंडलांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २ लाख ४० हजारांवर हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्के अधिक नुकसान झाले. त्यात कपाशीचे बाधित क्षेत्र १७ हजार २८३ हेक्टर, तर तूर पिकाचे बाधित क्षेत्र २१ हजार ४५७ हेक्टर आहे.

कपाशी पीक नुकसान क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका नुकसान क्षेत्र

परभणी ९८४७

जिंतूर २९२०

सेलू २४७७

मानवत ४४५२

पाथरी २२३६

सोनपेठ ९५७

गंगाखेड ७२५

पालम ३९००

पूर्णा ५७१५

हिंगोली ३६७७

कळमनुरी ३५००

वसमत १६१८

औंढा नागनाथ ५८००

सेनगाव २६८८

मॉन्सूनोत्तर पाऊस तूर पीक नुकसान क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका नुकसान क्षेत्र

परभणी १५०६

जिंतूर ५९२९

सेलू १०३३

पाथरी ३००

सोनपेठ २५४

पालम १४००

पूर्णा २०९३

हिंगोली ६४००

कळमनुरी २०००

वसमत ७९४

औंढा नागनाथ २३७०

सेनगाव ९८९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dushkal Sangharsh Yatra : हक्काच्या मदतीसाठी शेतकरी एकवटले; दुष्काळ संघर्ष यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत

Farm Loan Waiver : सातबारा कोरा कधी होणार? वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस

Mustard Farming : गडचिरोलीत मोहरीची शेती बहरणार; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागाचा नवा उपक्रम

KDCC Bank Loan Scheme: ‘केडीसीसी’ बँक आता म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज

Umed Abhiyan : पाथर्डीत मोठी खळबळ: उमेद अभियानांतर्गत ग्रामसंघाच्या खात्यातून परस्पर १ लाख रुपये रक्कम काढली

SCROLL FOR NEXT