Cotton Crop Damage : कापसाच्या वाती, माती मिश्रित कापसाला फुटले कोंब

Unseasonal Rain : कायगाव, अगरवाडगाव (ता. गंगापूर) येथे अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. उरल्यासुरल्या कपाशीच्या कैऱ्या सडून जात असून काही ठिकाणी वेचणीस आलेल्या कपाशीच्या वाती होऊन त्यांना अंकुर फुटले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : कायगाव, अगरवाडगाव (ता. गंगापूर) येथे अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. उरल्यासुरल्या कपाशीच्या कैऱ्या सडून जात असून काही ठिकाणी वेचणीस आलेल्या कपाशीच्या वाती होऊन त्यांना अंकुर फुटले आहे. यंदा उत्पादन घटणार असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा मॉन्सूनोत्तर पावसाच्या फटक्याने शेतीपिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पुरता हताश झाला आहे.शेतीला केलेला खर्च निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जामगाव आणि भेंडाळा महसूल मंडळात दिवाळीच्या सणामुळे वेचणी अभावी झाडाला राहिलेला कापूस भिजला आहे. तर नवीन लागवड झालेला ऊस, पेरणी झालेला हरभरा, गहू या पिकांची दाणादाण झाली आहे.

Crop Damage
Onion Crop Damage : कांदा रोपांवर तणनाशक फवारल्याने मोठे नुकसान

अनेक शेतात मॉन्सूनोत्तर पावसाचे पाणी तुंबल्याने शेत जलमय झाले आहे. कायगाव, अमळनेर, लखमापूर, भिवधानोरा, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी आदी भागात रविवारी (ता. २६) नोव्हेंबर २०२३ ते शनिवारी (ता. २) डिसेंबर २०२३ पर्यंत झालेल्या पावसाने पीक नुकसानीचे प्रमाण अधिक आहेत.

हातातोंडाशी आलेल्या हुरडा ज्वारी, फळपीक, कांदा रोप, कापूस सर्वच पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे उरल्या शिरल्या पिकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. अनेक ठिकाणी ऊस लागवड केलेल्या शेतात पाणी साचले आहेत तर साखर कारखान्याला ऊस तोडणी अवस्थेत असलेला उभा पीक आडवा पडला आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’ने बीडमध्ये २८६ हेक्टर पिकांचे नुकसान

तूर, ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे. आतून कपाशीचे बी फुगून कोंब आले आहे. तर अनेक ठिकाणी कपाशीची सरकी हलकी झाल्याने वजन घटले. परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. डोळ्यांसमोर नुकसान पाहून शेतकरी हताश झाला आहे.

माझे पाच एकरमधील कापूस वेचणीला आलेला २० ते २५ क्विंटल कापूस भिजला आहे. सलग पाच दिवस सारख्या झालेल्या पावसाने कापसाच्या पूर्ण वाती झाल्याने मोड फुटले आहे. पांढरा शुभ्र दिसणारा कापूस काळा पडला आहे. प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.
- पांडुरंग पाटील वाघ , शेतकरी अगरवाडगाव
मी यंदा १४ एकर कापूस लागवड केली होती. सुमारे १०० क्विंटल कापूस हातात येईल अशी अपेक्षा हाती.मात्र पहिल्या वेचणीत ४० क्विंटल कापूस घरात आला.दुसऱ्या वेचणीला बेमोसमी पाऊस पडल्याने वेचणीस आलेला कापूस भिजला.आता ३० क्विंटल उत्पन्न हाती येईल. यामुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे.
- अशोक श्रीधर निरपळ पाटील, शेतकरी, गणेशवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com