Latur Market agrowon
ॲग्रो विशेष

Latur Market : शेतकऱ्यांचं एक पायली सोयाबीन का कापलं जातं? लातूर बाजारात हमालीसोबतच पायलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

Soybean Market : लातूर बाजार समितीत हमालीसोबतच पायलीही दिली जाते. १० क्विंटल मालामागे ४ ते ५ किलो मालाची कपात केली जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अनिल जाधव

Latur news : बाजारात आपलं सोयाबीन किंवा इतर शेतीमाल विक्रीसाठी नेल्यानंतर तो आपल्या गाडीतून खाली उतरवणं, मोजमाप करणं, बारदाणा खाली करणं अशी कामं हमाल करत असतात. या कामासाठी आपल्याकडं हमालांना हमाली दिली जाते. पण लातूर बाजार समितीत हमालीसोबतच पायलीही दिली जाते. १० क्विंटल मालामागे ४ ते ५ किलो मालाची कपात केली जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

लातूर बाजार समितीत हमालांसाठी हमालीसोबतच पायली सुध्दा घेतली जाते. एक पायली म्हणजे साधारण ४ ते ५ किलो. समजा सोयाबीनचे १० क्विंटल मोजमाप झाले की ४ ते ५ किलो सोयाबीन कापले जाते. म्हणजे वजनातून कट केले जाते. आता तुम्ही सोयाबीनला ५ हजारांचा भाव पकडला तर १० क्विंटलला २०० ते २५० रुपये हमालांना द्यावे लागतात. म्हणजेच क्विंटलमागं २० ते २५ रुपये.

बरं ही पायली का कपाली जाते? तर हमाल हमाली काम करतात म्हणून. आता आपण बाजार समितीत दरवर्षी सोयाबीन घेऊन जातच असाल. आपली गाडी अडत्यांच्या दुकानासमोर लागली की, आपल्या गाडीतील पोते हमाल खाली घेतात. माल विकला की आपला बारदाना रिकामा करून गठ्ठा बांधून आपल्या गाडीत आणून टाकतात. आता तुम्हा सगळ्यांच्या मनात विचार आला असेल की यासाठी तर हमालांना हमाली दिली जाते. लातूर बाजारात हमाली दिला जात नसावी म्हणून पायली देतात. पण असं नाही. लातूर बाजार समितीत हमालीही घेतील जाते. लातूर बाजारात एक क्विंटलची हमाली आहे १० रुपये. हमालीव्यतिरिक्त ही पायली घेतली जाते. हमाली आणि पायलीचा हिशोब केला तर शेतकऱ्यांना हमालांना क्विंटलमागं ३० ते ३५ रुपये द्यावे लागतात.

बरं पायलीचा हा नियम लिखित नाही. हा अलिखित नियम आहे. पूर्वी हमालीऐवजी केवळ पायली घेतली जायची. नंतर हमाली आली. अनेक बाजारात पायली बंद झाली. पण लातूर बाजारात हमाली आली पण पायलीचा नियम अगदी तंतोतंत पाळला जातो. लिखित नियम आहे हमालीचा. बाजार समिती प्रशासनाने क्विंटलला १० रुपये हमाली ठरवली आहे. पण शेतकऱ्यांकडून हमाली तर घेतली जाते. पण पायली घेण हा हमालांचा अधिकारच होऊन बसला, असं शेतकरी सांगतात.

ही पायली का घेतील जाते? याविषयी आम्ही बाजार समितीत प्रशासनाकडे विचारणा केली. यावर बाजार समिती प्रशासनाने सांगितले की, कोणतीही कपात बळजबरी केली जात नाही. कपातीला शेतकऱ्यांचाही विरोध नसेल त्यामुळे याविषयी आमच्याकडे तक्रार आली नाही. बाजार समितीतील व्यवहार सगळ्यांच्या संमतीने चालतात. थोडक्यात काय तर पायली प्रथेला शेतकऱ्यांचा विरोध नाही, असं बाजार समितीला म्हणायचं. पण दुसरीकडं शेतकऱ्यांनी सांगितलं की पोटली व्यवहार आणि पायली बंद व्हावी ही आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याकडे ना बाजार समिती प्रशासन लक्ष देत ना संचालक मंडळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT