Water Crisis : पुणे जिल्ह्यात केवळ पुरंदर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

Water Supply By Tanker : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Pune News : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांत सुरू असलेले टँकर बंद झाले आहेत. मंगळवारी (ता. ३) जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ५१ टँकर सुरू होते.

Water Crisis
Water Crisis : राज्यातील ६५ धरणांत ८० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

बुधवारी त्यापैकी चार तालुक्यांतील ४० टँकर बंद करण्यात आले. आता फक्त पुरंदर तालुक्यात ११ टँकर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने टँकरच्या संख्येत वाढ झाली होती. मे महिन्यात आंबेगाव, भोर, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांतील १०५ वाड्यावस्त्यांमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

Water Crisis
Water Crisis : पावसाळा संपत आला तरी शेटफळगढेमध्ये टँकरने पाणी

साधारणपणे ४० हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढली. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील सुमारे १ लाख ११ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविली जात होती.

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यातच अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने कमी करण्यात आलेली टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ३९ गावे व २८९ वाड्यावस्त्यांना ५१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यात दहा सरकारी तर ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू होती.

मात्र जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस शिरूर, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, इंदापूर, बारामती या तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने टँकर सुरू असलेल्या गावांमधील पाणीपातळीत वाढ झाली.

विहिरींना आणि बोअरवेल यांना पाणी आल्याने या गावातील नागरिकांची पाण्याची सोय झाली. त्यामुळे आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांतील टँकर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com