Milk Producer agrowon
ॲग्रो विशेष

Milk Producer : तीन लाख दूध उत्पादकांची लूट, तुकाराम मुंडे यांच्या सूचनेलाच केराची टोपली

Tukaram Munde : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. हे अधिकारी मूठभर संस्थांना पाठीशी घालत आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Milk Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांकडील वजन काट्यावर दहा मिली अॅक्युरसी न केल्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख दूध उत्पादकांची लूट सुरू आहे. ही लूट थांबवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अशा संस्थांवर तत्काळ कारवाई न करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक रुपेश पाटील यांनी मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्यात म्हटले आहे की, मुंडे यांनी दिलेल्या चौकशी किंवा कारवाईचे पत्र - कार्यालयाला मिळाले नसल्याचे सांगत आहेत. या पत्राची प्रत दाखवल्यानंतर संस्थांशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाखो दूध उत्पादकांच्या दैनंदिन संकलनातील फसवणूक शोधणे व संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

याबद्दल तत्काळ कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. हे अधिकारी मूठभर संस्थांना पाठीशी घालत आहेत. ही फसवणूक थांबवली पाहिजे. जिल्ह्यात तपासणी मोहीम व धडक कारवाई करून संबंधित संस्थांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून रोखले पाहिजे; अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT