Tur Rate : महिला गटाने तुरीला मिळविला १०१२५ रुपये दर

Tur Market : विकली १५१ क्विंटल तूर; लागवड ते विक्रीच्या व्यवहारामुळे आत्मविश्‍वास दुणावला
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः करमाळा तालुक्यातील फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिला सदस्यांनी एकत्रित येत ‘पाणी फाउंडेशन’च्या मार्गदर्शनाखाली तुरीची लागवड केली. योग्य व्यवस्थापन करत तुरीचे चांगले उत्पादन मिळवले आणि आता थेट बाजार समितीत जात तुरीची विक्रीही केली. त्यांच्या तुरीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १० हजार १२५ रुपये इतका दर मिळाला.

कधीही बाजार समिती न पाहिलेल्या या महिलांनी स्वतः पुढाकार घेत उत्पादन ते विक्रीपर्यंतच्या केलेल्या या व्यवहारामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा आत्मविश्‍वास दुणावला.

फिसरेतील जिजाऊ महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक मनीषा रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटाने ही कामगिरी केली. या बाबतचा आपला अनुभव सांगताना मनीषाताई म्हणाल्या, की बाजारपेठ, शेतीमाल विक्री याचा आणि आमचा काहीच संबंध नव्हता, या आधी आम्ही शेतात राबायचो आणि घरातले पुरुष शेतीमाल विक्री करून यायचे. पण पहिल्यांदा ‘फार्मर कप’मध्ये सहभागी होऊन आम्ही उत्तम पद्धतीने शेती केली. या प्रक्रियेत आमचा आत्मविश्‍वास वाढला.

आपल्या शेतीमालाची विक्रीही स्वतः करावी अशी भावना निर्माण झाली, त्यातून आम्ही स्वतः सर्व महिलांनी बाजार समितीत जाऊन तुरीची विक्री केली, असे त्या म्हणाल्या. शेतीमाल विक्रीसाठी जेव्हा आम्ही बाजार समितीत गेलो. तेव्हा तिथे सगळीकडे व्यापाऱ्यांची दुकानं आणि फक्त पुरुषच. या बाया इथं कशा काय आल्या आहेत, अशा प्रश्‍नार्थक चेहऱ्याने आमच्याकडे प्रत्येक जण बघत होते, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

Tur Rate
Tur Market Rate : तुरीला ९ हजारी दर, डाळ १३० रुपये किलो


वन ग्रेडमुळे २५ रुपये जादा दर
बाजारपेठेत तुरीचा दर्जा पाहून ८५०० ते ९००० दर दिला जात होता. पण आमच्या तुरीची गुणवत्ता पाहून सर्वाधिक १० हजार १२५ रुपये दर आमच्या तुरीला मिळाला.

FSSAIच्या निकषानुसार आमची तूर सुरक्षित ठरली. त्यामुळे स्वतःहून व्यापाऱ्यानंही २५ रुपये जादा दर दिला. तुमचा माल वन ग्रेड आहे, असं कौतुकही त्यांनी केल्याचं मनीषाताईंनी सांगितले.


१५ एकरांत १५१ क्विंटल उत्पादन
पाणी फाउंडेशनाच्या फार्मर कपमध्ये फिसरेतील जिजाऊ महिला शेतकरी गटाने सहभाग घेतला आहे. फाउंडेशनचे समन्वयक प्रतीक गुरव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गटातील मनीषा समाधान रोकडे, राधा विजय अवताडे, इंदुमती राजेंद्र गायकवाड, आक्काताई पांडुरंग आवताडे, सुवर्णा संतोष गायकवाड, सविता बापू गायकवाड,

जना दादा गायकवाड, मनीषा गोपीनाथ रोकडे, रामकुंवर रघुनाथ साळख, आश्‍विनी नवनाथ वाघ, आश्‍विनी हरिदास आवताडे अशा ११ महिला शेतकऱ्यांनी कोणी अर्धा, कोणी एक एकर याप्रमाणे गोदावरी वाणाच्या तुरीची १५ एकरांवर लागवड केली. आज या सर्व महिलांनी एकरी सरासरी १० क्विंटल प्रमाणे एकूण १५१ क्विंटल उत्पादन घेतले. आता या सर्व तुरीची विक्रीही त्यांनी एकत्रितच केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com