Logistics Park Agrowon
ॲग्रो विशेष

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Kaudgaon MIDC: राज्य सरकारमार्फत प्रस्ताव आल्यानंतर कौडगाव (ता. धाराशिव) येथील एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यास मंजुरी देऊ, असे आश्वासन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिले.

Team Agrowon

Dharashiv News: राज्य सरकारमार्फत प्रस्ताव आल्यानंतर कौडगाव (ता. धाराशिव) येथील एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यास मंजुरी देऊ, असे आश्वासन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिले.

या मागणीसाठी दोघांनी सोमवारी (ता. २८) संसद भवनातील कार्यालयात श्री. गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.कौडगाव एमआयडीसीसाठी एकूण ३८०.५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यातील ९० हेक्टर क्षेत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी तर ७० हेक्टर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

उर्वरित २२०.५० हेक्टरवर धाराशिव लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. धाराशिव हे भौगोलिकदृष्ट्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ व राज्य महामार्ग ६७, धाराशिव रेल्वे स्थानकाजवळ असल्याने लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य ठिकाण आहे. प्रस्तावित सूरत- चेन्नई महामार्गदेखील या परिसरातून जाणार आहे.

हा प्रकल्प राज्याच्या तसेच दक्षिण भारताच्या व्यापारवाढीला चालना देणारा ठरु शकतो. लॉजिस्टिक पार्कमध्ये कोल्ड स्टोरेज, ड्रोन लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट हब, पॅकिंग यासारख्या सेवा विकसित करता येतील. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच ते तीन हजार थेट रोजगार व हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश प्रोत्साहन जिल्ह्यांमध्ये करण्यात आला  असून जिल्हा लॉजिस्टिक नोड म्हणून मान्यता मिळाल्यामुळे या प्रकल्पास धोरणात्मक पाठबळही मिळू शकते, आदी बाबी खासदार राजेनिंबाळकर व आमदार घाडगे यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर केंद्रीयमंत्री गडकरी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून  प्रस्ताव आल्यास प्रकल्पाला मंजुरी देऊ, असे आश्वासन त्यांनी आल्याचे श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

एमआयडीसींतून २५ हजार रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

कौडगाव, वडगाव, होर्टी येथील एमआयडीच्या कामांना आता मोठी गती मिळाली आहे. वडगाव येथील ८०.४६ हेक्टर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. पुढील आठवड्यात येथील पायाभूत विकास कामाची निविदा जाहीर होईल. देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत कामांनाही गती मिळाली आहे.

१७ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते, वीज, पाणीपुरवठा यांसारख्या विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्व औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी २५ हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीच्या कामांच्या सोमवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत होर्टी, वडगाव कौडगाव, वाशी, शिराढोण येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. होर्टी येथे २०.२० हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने ताब्यात घेतले आहे. तिथे वाढीव जागेसाठी चाचपणी सुरु आहे. वडगाव येथे ८०.४६ हेक्टर जमीन सध्या एमआयडीसीच्या ताब्यात मिळाली असून लेआउटच्या नियोजनाचे कामही मंजूर आहे. त्यानुसार पायाभूत सोयी सुविधांसाठी विकास कामे हाती घेतली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Trump Trade Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे कापड, कोळंबी, सोयापेंडला फटका

Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Animal Husbandry : पशुपालकांना वीज, कर, व्याज सवलत

SMART Project : ‘स्मार्ट’मधून आणखी दोन हजार कंपन्यांना मदतीचा प्रस्ताव

Sugarcane Farming : ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT