Mahayuti Leaders and Anil Ghanwat Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: कर्जमाफी, शेतीमालाला भाव दिला नाही; महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचा इशारा 

Agriculture Issue: महायुती सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज, हमीभाव आणि महिलांना आर्थिक मदतीची आश्वासने दिली होती. मात्र सरकारने ती पूर्ण न करता शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात स्वतंत्र भारत पक्षाने १४ एप्रिलला जाहीरनाम्याची होळी करण्याचा इशारा दिला आहे.

Roshan Talape

Mumbai News:  महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज, शेतमालाला हमीभाव, महिलांना २१०० रुपये आर्थिक मदत, बेरोजगारांना १० हजार भत्ता, जेष्ठ नागरिकांना दरमहा २१०० रुपये अनुदान आदी आश्वासने दिली होती. मात्र सरकारने ही आश्वासने पूर्ण न करता शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे, याच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले की, शासनाने आठ दिवसांत कर्जवसुली थांबवावी व आश्वासने पूर्ण करावी, अन्यथा १४ एप्रिलपासून राज्यभर जाहीरनाम्याची होळी केली जाईल. स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात महिला, युवक, बेरोजगार, कर्जदार शेतकरी आणि जेष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फडणवीस, शिंदे पवार यांना पत्र

अनिल घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन पाठवून आठ दिवसांत आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, १४ एप्रिलपासून राज्यभर जाहीरनाम्याची आणि बँक वसुलीच्या नोटिसांची होळी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

लढा उभारणार 

घनवट म्हणाले की, महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज, शेतमालाला हमीभाव, महिलांना २१०० रुपये आर्थिक मदत, बेरोजगारांना १० हजार भत्ता, जेष्ठ नागरिकांना दरमहा २१०० रुपये अनुदान आदी आश्वासने दिली होती. मात्र ही आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. उलट शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसा पाठवल्या जात आहेत. याविरोधात लढा उभारण्यात येणार आहे.

या आंदोलनात शेतकरी संघटना, बेरोजगार तरुण, लाडकी बहिण योजना लाभार्थी, जेष्ठ नागरिक आणि इतर घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. महिला, तरुण आणि शेतकऱ्यांनी युती सरकारच्या विरोधात एकजूट होण्याचे आवाहन स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 7th Installment : शेतकऱ्यांना दिलासा; नमोच्या सातव्या हप्त्यासाठी १९३२ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Farmers Celebration: शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे!

Agriculture Technology: मजुरी, वेळेत बचत करणारे ऊसतोडणी यंत्र

Monsoon Rain Forecast: राज्यात २ दिवस पावसाची शक्यता; कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

Rain Crop Damage: खानदेशात पावसाने हानी, अनेक भागांत हजेरी

SCROLL FOR NEXT