Farmer Protest : कर्जमाफीसाठी विहिरीत बाज टाकून सुरू केलेले उपोषण अखेर मागे

Loan Waiver Protest : राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले शेतकरी कर्जमाफीचे वचन पाळावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कारभारी म्हसलेकर यांनी बुधवारपासून (ता. २६) अकोला येथील सार्वजनिक विहिरीत बाज टाकून उपोषण सुरू केले होते.
Farmer Protest
Farmer Protest Agrowon
Published on
Updated on

Jalna News : राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले शेतकरी कर्जमाफीचे वचन पाळावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कारभारी म्हसलेकर यांनी बुधवारपासून (ता. २६) अकोला येथील सार्वजनिक विहिरीत बाज टाकून उपोषण सुरू केले होते. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक पी. बी. वरखडे यांनी उपोषणकर्ते कारभारी म्हसलेकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्या तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे लेखी आश्‍वासन दिले, त्यानंतर गुरुवारी (ता. २७) म्हसलेकर यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, जिल्हा उपप्रमुख भगवानराव कदम, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख भानुदास घुगे, स्वराज्य पक्षाचे पंकज जऱ्हाड, ऋषिकेश थोरात, दत्ता सांगळे, सोपान काळे, सरपंच माधवराव गिते, माधव डवणे, इम्रान शेख आदींची उपस्थिती होती.

Farmer Protest
Farmer Loan Waive : जायकवाडी ऊर्ध्व धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तारूढ झाले. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जाणीवपूर्वक विसर पडला. राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Farmer Protest
Farmer Loan Waive : पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करण्याची मागणी

त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी कारभारी म्हसलेकर यांनी अकोला शिवारातील सार्वजनिक विहिरीत बाज टाकून बुधवारपासून (ता. २६) आमरण उपोषण सुरू केले होते.

शासन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचे विहिरीत बाज टाकून आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेण्यात आली होती. अखेर गुरुवारी दुपारी जिल्हा सहायक निबंधक श्री. वरखडे यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी आंदोलनस्थळी आदींसह शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com