Crop Damage
Crop Damage Agrowon

Natural Calamity Compensation : नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे अनुदान मंजूर

Heavy Rain Crop Loss : गत वर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले.
Published on

Amaravati News : गत वर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाकडे मदतनिधीची मागणी करण्यात आली. ती मंजूर झाली असून अमरावती जिल्ह्यासाठी १८ .९३ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील काही भागास अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने सोयाबीन, मुग व उडीद पिकाचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे विभागीयआयुक्तांमार्फत पाठविला.

या अहवालात जिल्ह्यातील ४६ हजार ९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना बाधा पोहोचली असून ५१ हजार २६२ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे नमूद आहे. तर, यानंतर सप्टेंबर महिन्यातही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसून ९ हजार १२१ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झालीत.

Crop Damage
Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्यात सहा लाख शेतकऱ्यांना ७०४ कोटींचे वितरण

यावेळी फळबागांचे अधिक प्रमाणांत नुकसान झाले होते. ११ हजार ७०७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने ३ ऑक्टोबर व ३० ऑक्टोबर असे दोन अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवत एकूण १८ कोटी ९३ लाख रुपये अनुदानाची मागणी केली. यामध्ये ऑगस्ट महिन्यातील ६.५३ व सप्टेंबर महिन्यासाठी १२.४० कटी रुपयांची मागणी समाविष्ट आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

कर्जखात्यात जमा करू नये

नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्याने देण्यात येणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. निधी येताच बॅंका या निधीतील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करीत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

मंजूर झालेले अनुदान

महिना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र निधी (कोटी रुपये)

ऑगस्ट ५१,२६२ ४६०९४ ६.५३

ऑगस्ट ते सप्टेंबर ११,७०७ ९,१२१ १२.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com