Animal Ear Tagging Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Ear Tagging : पशुधनाची टॅगिंग मोहीम आता युद्धपातळीवर

Ear Tagging Update : सोलापुर जिल्ह्यात पशुधनाची टॅगिंग मोहीम युद्धपातळीवर सुरु असून जूनपासून जनावरांना शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार व नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळण्यासाठी इअर टॅगिंगची (कानावर नोंदणी बिल्ला) सक्ती असणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यात पशुधनाची टॅगिंग मोहीम युद्धपातळीवर सुरु असून जूनपासून जनावरांना शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार व नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळण्यासाठी इअर टॅगिंगची (कानावर नोंदणी बिल्ला) सक्ती असणार आहे.

शासनाने जनावरांची माहिती योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावी. तसेच प्रत्येक जनावरांची नोंद होऊन पशुपालकांना उत्तम सेवा मिळावी यासाठी टॅगिंग मोहिमेचा आग्रह धरला आहे. त्यासाठी जनावरांचे टॅगिंगचे काम केले जात आहे. मागील काही महिन्यापासून टॅगिंगचे काम सुरु आहे.

मात्र जूनपासून फक्त टॅगिंग केलेल्या जनावरांनाच उपचार व पशुपालकांस भरपाईचा लाभ मिळवता येणार आहे. त्यामुळे पशुपालकांसाठी टॅगिंग करणे बंधनकारक बनले आहे. अाता पशुपालकांनी पूर्वीपासून बाळगलेली जनावरे, नव्याने जन्मलेले पशुधन व खरेदी केलेल्या जनावरांची टॅगिंग करावी.

केंद्राच्या नॅशनल लाईव्हस्टॉक डिजिटल मिशनच्या अंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. टॅगिंगमध्ये प्रत्येक जनावरास १२ अंकी क्रमांक दिला जातो. या क्रमांकानुसार जनावरांचे टॅगिंग केले जाते. सर्वच जनावरांसाठी ही योजना असली तरी गाई व म्हशीच्या संदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. या टॅगिंगमुळे जनावरांची जात, वंश, वय, मुळ स्थान, वेत आदी माहिती नोंदवली जाणार आहे. एकदा ही माहिती नोंदविल्यानंतर जनावरांच्या बाबतीत कधीही माहितीच्या आधारे सर्व प्रकारची मदत पशुपालकांना मिळवता येणार आहे.

जिल्हयात १२ लाख ४१ हजार जनावरांची संख्या

यापूर्वी जिल्ह्यात टॅगिंगचे काम काही प्रमाणात पूर्ण

३१ मे पर्यंत

टॅगिंग करणे गरजेचे

जूनपासून शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील टॅग नसलेल्या जनावरांना उपचार सेवा मिळणे होणार बंद

नैसर्गिक आपत्तीतील भरपाई टॅग असलेल्या जनावरांसाठी मिळणार

जिल्हाभरात जनावरांना टॅग करण्याची मोहीम सुरु आहे. अधिकाधिक पशुपालकांनी जागरूकपणे टॅग मोहिमेत सहभागी व्हावे. जेणेकरून त्यांच्या जनावरांना नियमित उपचारसेवा व नुकसान भरपाईचे लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
डॉ. धनाजी गिड्डे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT