Palghar News : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये १२ अंकी बार कोड ईअर टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे,
अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. पशुधनाच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, हस्तांतरण, कत्तल होणाऱ्या पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येणार आहेत.
३१ मेपर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे. पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय १ जूननंतर खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यासाठी या प्रणालीमध्ये पशुधनाच्या कानात ईअर टॅगिंग करून नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री आदी सर्व नोंदी घेतल्यामुळे माहिती तयार होणार आहे.
या कोषाच्या आधारे शेतकरी, पशुपालकांना सरकारच्या सुविधा, योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारावर कारवाई करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.