Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Animal Husbandry Department : पशुपालक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या जनावरांना इअर टॅग मारावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
Ear Tagging
Ear TaggingAgrowon
Published on
Updated on

Parola News : शासनाने १ एप्रिलपासून सर्व जनावरांना इअर टॅगिंग १२ अंकी आकड्यांचा बिल्ला लावणे बंधनकारक केले आहे. यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या जनावरांना इअर टॅग मारावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी जनावरांना टॅगिंग करून घ्यावे; अन्यथा शासनाकडून कोणतेही उपचार, नुकसानभरपाई, अनुदान लाभ मिळणार नाही. असे सूचित करण्यात आले आहे.पशुवैद्यकीय दवाखान्यात येणाऱ्या जनावरांच्या सर्व तपासण्या, लसीकरण, एक्स-रे, सोनोग्राफी उपचार करण्यासाठी शासनाच्या भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.

Ear Tagging
Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

गाय, म्हशी, शेळ्या, वासरू, बैल, गोऱ्हे, रेडे आदी पाळीव जनावरांना बाराअंकी बिल्ला कानाला लावणे बंधनकारक आहे.तेथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा इअर टॅगिंग केली व ऑनलाइन नोंदणी केली असेल, तरच दुसऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यापुढे बिल्लाविरहित तपासणी करणार नाहीत, याबाबत पशूमालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅगिंग असेल तरच भरपाई

जंगली वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाल्यास वन विभागाने नुकसानभरपाई देताना इअर टॅगिंग असेल, तर अशा पशुपालकांना यापुढे नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. संसर्ग आजाराने अथवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरे दगावले, तर नुकसानभरपाईसाठी या जनावरांचे इअर टॅगिंग असणे शासनाने बंधनकारक केले आहे.

Ear Tagging
Animal Ear Tagging : पालघरमधील सर्व जनावरांचे ईअर टॅगिंग

खरेदी-विक्री होणाऱ्या जनावरांना इअर टॅगिंग असेल, तरच पशूपालकांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्राबाहेर राज्यातून जनावरांना इअर टॅगिंग असेल, तरच राज्यात आणता येणार आहे. बिगर इअर टॅगिंगच्या जनावरांची वाहतूक करता येणार नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.

तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांचे इअर टॅगिंग सुरू आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून जनावरांना बाराअंकी बिल्ला कानाला लावून घ्यावा. जेणेकरून येणाऱ्या काळात अडचण येणार नाही. दरम्यान, इअर टॅगिंग केलेल्या पात्र जनावरांना ग्राह्य धरून चारा छावणीत दाखल करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे इअर टॅगिंग अत्यावश्यक असून, पशुपालकांनी तत्काळ आपली जनावरे इअर टॅगिंग करून घ्यावीत.
डॉ. योगेश देशमुख, पशुधन विस्तार विकास अधिकारी, पारोळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com