Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

Fodder Scarcity : चाराटंचाईचे संकट तीव्र झाल्याने येथील भगवान आश्रमात गोशाळेतील जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : चाराटंचाईचे संकट तीव्र झाल्याने येथील भगवान आश्रमात गोशाळेतील जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आश्रमाच्या गोशाळेत २१० गाईं असून त्यांना चारा पुरवतांना आश्रमाच्या गोशाळेची चाऱ्यासाठी वणवण सुरु आहे.

त्यामुळे गोशाळा वाचवण्यासाठी गाईंना चारा देण्याची मदत करावी, असे आवाहन ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी केले आहे. सातगाव डोंगरी हे गाव खानदेश आणि मराठवाड्याच्या हद्दीवर असून जळगाव- पाचोरा- सातगाव डोंगरी ते घाटनांद्रा घाटातून मराठवाड्यात जाण्यासाठी मोठा मार्ग आहे.

सदर भाग अजिंठा पर्वताच्या पायथ्याशी येत असल्याने जमीन फारशी सुपीक नसल्याने तसेच पाणीटंचाई असल्याने रब्बी पिकाचेही शेतकऱ्यांना चांगले नियोजन करता येत नाही. त्यामुळे दरवर्षीच या परिसरात चारा टंचाई निर्माण होत असते. त्यात गोशाळेतील गाईंना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चारा टंचाई पासून वाचविणे तर ज्ञानेश्वर माऊलींना फार कठीण जात असते.

शासनाचा एक रुपयाही न घेता ज्ञानेश्वर महाराज माऊली परिसरातील आणि दानशूर व्यक्तींच्या दानावरच गोशाळा सुरू आहे. तसेच माऊली महाराज दुर दुर वर भक्तांसाठी ट्रिप काढत असतात. त्या ट्रीपच्या माध्यमातून जो त्यांना नफा राहील. त्या नफ्यावर सदर गोशाळा चालवतात आश्रमातील काही गाही दूध देतात. ते सर्व दूध वासरांनाच पाजले जाते. त्यामुळे परिसरातील शेतकरी बऱ्याच वेळेला चाऱ्या अभावी गाई कसायाला न विकता आश्रमात आणून सोडतात.

आजच्या स्थितीला गायींची संख्या २१० आहेत सध्या उन्हाचा तडाका खूप असल्याने गाईंना रानात फिरवणे सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे आश्रमातच बसून चारा खाऊ घालावा लागतो. सद्यःस्थितीत थोडासा चारा शिल्लक असल्याने ज्ञानेश्वर माऊलींना परिस्थिती गंभीर होताना दिसते आहे. परिसरातील नागरिकांनी आणि दानशूर व्यक्तींनी गायींना वाचवण्यासाठी सढळ हाताने मदत करा. असे आवाहन ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. मागील वर्षीही अनेकांनी चारा दान करून गोशाळेच्या आश्रमावर पोहच सुद्धा केलेला होता.

परिसरातील आणि दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीवरच आश्रमातील गोशाळा सुरू आहे. शासनाची एक रुपयाही मदत मिळालेली नाही. ग्रामस्थांच्या आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच गोशाळा उभी आहे. सध्या चाऱ्याची टंचाई खूपच असल्याने गायींना वाचवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे.
- ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज, सातगाव डोंगरी, पाचोरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT