Maharashtra Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत हलका, मध्यम पाऊस

Rain Alert : सोयगाव तालुक्यात सरासरी १९.४ मिलिमीटर, सिल्लोडमध्ये सरासरी १५.६ मिलिमीटर, कन्नडमध्ये सरासरी १२.५ मिलिमीटर, तर वैजापूरमध्ये सरासरी १०.५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जालना जिल्ह्याच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांतील अनेक मंडलांमध्ये पावसाचा जोर थोडा अधिक होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८३ मंडलांत हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, कन्नड आणि वैजापूर तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक होता. सोयगाव तालुक्यात सरासरी १९.४ मिलिमीटर, सिल्लोडमध्ये सरासरी १५.६ मिलिमीटर, कन्नडमध्ये सरासरी १२.५ मिलिमीटर, तर वैजापूरमध्ये सरासरी १०.५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

इतर तालुक्यात सरासरी ९.८ मीटरच्या आतच पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. अंबड तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यांतील सरासरी पाऊस त्यापेक्षा कमीच होता. बीड जिल्ह्यात सरासरी वीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

त्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक सरासरी ३९.८ मिलिमीटर आष्टीत २९.९, परळी वैजनाथमध्ये २९.२, केजमध्ये २४.३, धारूरमध्ये २३.४, पाटोद्यात १८.६, बीडमध्ये १५, शिरूर कासारमध्ये १३.६, माजलगावमध्ये ९.८, गेवराईत ९.४, तर वडवणी तालुक्यातील सरासरी ८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील काही मंडलांत दमदार पावसाची हजेरी लागली.

जिल्हानिहाय पावसाची मंडल (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

कांचनवाडी १०.३, छत्रपती संभाजीनगर ६.३, उस्मानपुरा ७.३, भावसिंगपूर ७.३, कांचनवाडी ५, चिकलठाणा ६, लाडसावंगी ६.५, कचनेर १०, पंढरपूर १०.३, पिसादेवी ५, आडुळ ११.३, पिंपळवाडी ८, बालानगर १०.३, नांदर ११.५, लोहगाव ८.८, ढोरकीन ७.३, बिडकीन ७.८, पैठण ८, पाचोड ८.५, विहामांडवा १२, आपेगाव १०, निलजगाव ७.८, गंगापूर १२.५, मांजरी १४ , भेंडाळा १०.८, शेंदूरवादा१०, तुर्काबाद ९.३, हर्सूल १०, डोणगाव १०.३, सिद्धनाथ वडगाव ७, आसेगाव १०.५, गाजगाव ७, जामगाव ११, वैजापूर १५.३, खंडाळा १२, शिवूर ७.८, बोरसर १२, गारज ९.३, लासुरगाव ९.८, महालगाव १५, नागमठाण १५.५, लाडगाव १०.३, घायगाव ११.३, बाबतारा १३, देवगाव ७, पीशोर १६, नाचनवेल १९.५, चिंचोली २१.३, करंजखेड २१.३, नागद १४.३, वेरूळ ५.५, सुलतानपूर ६.८, सिल्लोड १०.५, निल्लोड १५.३, भराडी १४, गोळेगाव १४.८, अजिंठा २०.५, आमठाणा १९.५, बोरगाव १९.५, अंभई १७.३, पालोद ९.२५, उंडणगाव १४.३, सोयगाव २२.५, सावलदबारा २६, बनोटी १२.३, जरंडी १६.८, फुलंब्री ६.३, आळंद ८, वडोद बाजार ८.५, बाबरा ९.

जालना जिल्हा

जालना ग्रामीण ५.३, विरेगाव ७,अंबड ८.३ ,धनगर पिंपरी ६.५, रोहिलागड ५.८, सातोना ६.५, तीर्थपुरी ५.५.

बीड जिल्हा

बीड १५.५, पाली १९.५, राजुरी नवगन १०, मांजरसुंबा १४.५, चौसाळा २१.३, नेकनूर १५.८, लिंबागणेश २५.५, पाटोदा १८.३, दासखेड २३.३, अमळनेर २३, आष्टी ३४.५, कडा ३४.५, टाकळसिंग २२.३, दावलावडगाव २४.५, धामणगाव २४.८, धानोरा ३३.५, पिंपळा ४१.८, गेवराई ११.८, जातेगाव १०, धोंडराई १०.८, उमापूर १०, चकलांबा १०.३, रेवकी ११.८, तलवाडा १०, गंगामसला १२.५, किट्टीआडगाव ११.५, नित्रुड १०, अंबाजोगाई २०, पाटोदा (म) ३५.५, लोखंडी सावरगाव ३८, घाटनांदुर ५६, बरदापुर ५२, केज ३०.५, युसुफ वडगाव १९.५, हनुमंत पिंपरी २८.५, होळ १९.५, विडा २९.८, बनसारोळा ३०, घाटनांदुर २०.५, परळी ३९, धर्मापुरी ४३, नागापूर ३३.५, सीरसाळा १३.३, पिंपळगाव गाढे १७.३, धारूर ३०.३, मोहखेड १४.८, तेलगाव १४.८, शिरूर कासार १४.५, रायमोहा १९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT