Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ

Monsoon Rain : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे.
Monsoon Rain
Monsoon Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर ताम्हिणी घाटमाथ्यावर ५५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत राज्यातील धरणांत ११६ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे.

त्यामुळे वरसगाव, वारणा, बेंबळा, गोसी खुर्द, इटियाहोड, कासारसाई, मुळशी, वडीवळे, खडकवासला, वीर, राधानगरी, चिल्हेवाडी, अलमट्टी, कळमोडी ही धरणे भरली असून यामधून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा, मुळा, मुठा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, पवना, इंद्रायणी, आरळा, कानंदी अशा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

कोकणात जोरदार :

गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वच नद्या भरून वाहत आहेत. धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असून धरणे भरण्यास सुरुवात केली आहे. तासना, विहार, मोडकसागर ही धरणे जवळपास भरली आहेत.

दररोज होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात रोपांचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता वादळी वाऱ्याचे संकट उभे राहिले असून दोन दिवस जोरदार वारे वाहत आहेत.

त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २५) सकाळपासून जिल्ह्यात पावसाच्या सरीमध्ये देखील वाढ झाली होती.

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबला आहे. त्यामुळे पूरस्थितीचे संकट टळलेले आहे. मात्र वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरींमुळे अनेक भागात झाडे रस्त्यावर उन्मळून पडणे, घरांचे छप्पर उडून जाणे असे प्रकार वाढले आहेत.

Monsoon Rain
Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस

मध्य महाराष्ट्रात मुसळधार :

मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच घाटमाथ्यावर जोर अधिक आहे. मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ४८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

काही धरणे भरली असल्याने त्यातून विसर्ग सोडण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोर कायम असून, नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३२ फूट असून, त्यात वाढ सुरूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी झाली असून चोवीस तासांत १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वारणा धरणातून गुरुवारी (ता. २५) दुपारी १० हजार ४६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर पावसाने थैमान घातले होते. तर लवासा येथे ४५३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पुणे शहरातही पावसाने चांगलाच धुमाकूळ केला होता.

तर तुरळक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून विजेच्या धक्क्यामुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. तर पाच ते सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नाशिक, नगर, सातारा, सांगली जिल्ह्यांतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.

विदर्भात मध्यम पाऊस :

सध्या पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे.

त्यामुळे पूर्व विदर्भातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून गोसी खुर्द धरणातून दोन ते तीन दिवसांपासून विसर्ग सोडण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने धान पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ते बंद करण्यात येत आहे.

मराठवाड्यात हलक्या सरी :

मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळत आहे. सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण असले तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. मराठवाड्यातील बीडमधील घाटनांदूर मंडलात ५६, बदरापूर ५२, लातूरमधील अहमदपूर ५२, नांदेडमधील मुखेड ५१, येवती ५२, जाहूर ५२, बाऱ्हाळी ५० मिलिमीटर पाऊस झाला.

Monsoon Rain
Monsoon Rain : अकोला जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

कार्ला ३४९, महाबळेश्‍वर ३११, पौड, घोटावडे, माले, मुठे ३१२, आंबेगाव २५३, काले २२३, खडकाळा २०१, लोणावळा २७४, शिवणे २०१, वेल्हा, पानशेत २५९, ठाणे २०५, मुंब्रा २०५, धसइ २१३, देहरी २७३, नयाहडी २१३, पाली २०५, लामज २८२, बामणोली २०५.

गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर : (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : दहीसर, बेलापूर १३५, कल्याण १३५, टिटवाळा १४६, ठाकुर्ली १५५, नडगांव १०५, मुरबाड १८५, सरळगाव १७७, अप्पर भिवंडी १५५, अंगाव १२१, पडघा १०५, शहापूर, खर्डी, किनहवळी, डोळखांब १२०, उल्हासनगर, कुमभर्ली, अंबरनाथ ११५, गोरेगाव ११७, बदलापूर १२७, पनवेल १०९, पवयंजे ११३, तळोजे १३५, मोराबी ११३, कर्जत १७४, नेरळ १६२, कडाव १५१, कळंब २१०, कशेले १५१, चौक १७४, वौशी १२७, खोपोली १४४, आटोने १४६, जांभूळपाडा १८८, पेण, कामरली १२७, महाड १४९, बिरवडी १८९, करंजवडी १५३, नाटे ११७, खारवली १०६, तुडली ११७, रोहा १५९, नागोठणे ११०, कोलाड १३०, पोलादपूर, कोंडवी, वाकण १२१, मेंढा १३०, कळकवणे १०६, दापोली १५१, वाकवली १६०, पालगड १३७, वेळवी १५१, खेड १६०, शिर्शी ११८, आंबवली, कुळवंडी १२१, भरणे १२९, दाभीळ ११८, देवरुख, तुळसानी १०४, कणकवली, फोंडा, सांगवे, वागदे १०८, वाडा १२२, कोणे १२२, कांचगड १२६, मनवर १२६, खोडला १०८.

मध्य महाराष्ट्र : ननाशी १००, धारगाव ११९, वेळुंजे ११०, दहादेवडी १६४, पुणे वेधशाळा, केशवनगर १०४.५, कोथरूड १६०, खडकवासला १०४, खेड १०३, पिरंगुट १६०, भोलावडे ११२, वेळू १०४, निगुडघर १६९, वडगाव मावळ १३४, तळेगाव १४३, राजूर १००, डिंगोरे, आपटाळे १००, वाडा १२०, राजगुरुनगर ७६, कुडे १२०, पाईट १३४, चाकण १३२, आळंदी १०४, मेढा १४६, आणेवाडी १०४, केळघर १६२, करहर १३५, हेळवाक १४५, किन्हई १०५, तापोळा १८६, चरण १२९, मलकापूर १०५, राधानगरी, कसबा ११८, कराडवाडी ९९, आजरा, गवसे ९९.

विदर्भ : सावरगाव ६१, वणी ७६, राजूर ७३, भलार ७६, पुनवट ७३, कायार ६०, रासा ६०, शिरपूर ७३, गणेशपूर ७१, वानोजा ७४, देवळी ७८, विजय गोपाल, भिडी १२२, चंद्रपूर ७१, घुगस ८९, पडोली १२७, मूल १३२, बेंबळ १५७, चिखली १३२, वरोरा ८५, शेगाव ८६, खांबडा ७५, चिकणी ७४, भद्रावती ९०, नांदोरी ८५, चांदनखेडा ७५, मुधोळी ८४, मांगळी ११९, धोडपेठ ९०, नावरगाव १०१, शिंदेवाही ८९, मोहाली १०५, राजुरा ७१, सावळी, पाथरी, विहाड १३२, बल्लारपूर ७१, पोंभुर्णा १०३, गडचिरोली १४१, येवळी १४५, ब्राह्मणी १३०, भेंडाळा १५७, कासंसूर ११५, जरावंडी १२३, धानोरा १००, चाटेगाव १३०, पेंढरी १६२, बेडगाव १०६.

या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडला :

घाटमाथा --- पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये

ताम्हिणी --- ५५६

शिरगाव --- ४८४

अंबोणे --- ४४०

डुंगरवाडी --- ४०७

भिरा --- ४०१

दावडी --- ३६७

लोणावळा --- ३२९

वळवण --- २८७

खोपोली --- २२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com