Monsoon Rain : धो-धो कोसळधारांनी पुण्यात दाणादाण

Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २४) आणि गुरुवारी (ता. २५) दिवसभर जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २४) आणि गुरुवारी (ता. २५) दिवसभर जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला. लवासा येथे तर तब्बल ४५३ मिलिमीटर पाऊस कोसळला. पुणे शहरात पावसाने जनजीवन विस्कळित झाले. काही ठिकाणी दरडी कोसळल्या. विजेचा धक्का लागून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर सहा धरणांतून विसर्ग सोडण्यात आला.

पूर्व भागात कमी पाऊस असला तरी काही तालुक्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित उप-विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. पुणे महापालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही दिल्या. पुढील ४८ तासांत धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी, असे निर्देश डॉ. दिवसे यांनी दिले.

Monsoon Rain
Monsoon Rain : पावसामुळे मंदावला भातलावणीचा वेग

पुणे शहरातील कोंढवा खुर्दमध्ये मिलिटरी कंपाऊंडची भिंत कोसळली. आदरवाडी येथे दरड कोसळली. अति पावसामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके पुण्यातील एकता नगरमध्ये आणि एक टीम बालेवाडी येथे तैनात करण्यात आली. पुणे महापालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी पूल, संगम रस्ता पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रस्ता पूल, मातंग पूल, येरवडा, शांतिनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पूल पावसामुळे पाण्याखाली गेले.

सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमध्ये द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, श्याम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भिडे पूला शेजारील पूलाचीवाडी येथे ३ युवक विजेचा धक्का लागून मयत झाले आहेत. अभिषेक घाणेकर, आकाश माने व शिवा परिहार अशी त्यांची आहेत. मुळशीतील लवासा रोड येथे दरड कोसळली असून एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळविण्यात आले आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain : अकोला जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस

मुळशीतील दासवे, लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. या बंगल्यात ३ जण अडकले. पर्यटन स्थळ ठिकाणी २४ तासांकरिता बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. असाणे येथील माळीण ते कुंभेवाडी हा रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद झाला. हा रस्ता मशिनच्या मदतीने मोकळा करण्यात आला. तर भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेडमधून भीमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे.

पालकमंत्र्यांकडून आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा गुरुवारी दिवसभर आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

२०० मिलिमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे

कार्ला ३४९, पौड, घोटावडे, माले, मुठे ३१२.३, आंबेगाव २५३, काले २२३, खडकाळा २०१, लोणावळा २७४, शिवणे २०१, वेल्हा, पानशेत २५९.

गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतचा मंडलनिहाय पाऊस (१०० मिमींच्या पुढे)

हवेली - पुणे वेधशाळा, केशवनगर १०४.५, कोथरूड १६०, खडकवासला १०४, खेड १०३.

मुळशी - पौड, घोटावडे, माले, मुठे ३१२.३, पिरंगुट १६०.

भोर - भोलावडे ११२, वेळू १०४, निरगुडसर १६९.

मावळ - वडगाव मावळ १३४, तळेगाव १४३.

जुन्नर - राजूर १००, डिंगोरे, आपटाळे १००.

खेड - वाडा १२०, कुडे १२०, पाईट १३४, चाकण १३२, आळंदी १०४.

आंबेगाव - आंबेगाव २५३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com