Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : नांदेड विभागात अकरा कारखान्यांनाच गाळप परवाना

Sugarcane Crushing : २०२३-२०२४ करिता गाळप परवानासाठी अर्ज केलेल्या २९ साखर कारखान्यापेकी केवळ ११ साखर कारखान्यांचं गाळप परवाना मिळाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

Team Agrowon

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय नांदेड अंतर्गत गाळप हंगाम २०२३-२०२४ करिता गाळप परवानासाठी अर्ज केलेल्या २९ साखर कारखान्यापेकी केवळ ११ साखर कारखान्यांचं गाळप परवाना मिळाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड विभागात परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागीलवर्षी ३० साखर कारखाने सुरू झाले होते. यात १९ खासगी, तर ११ सहकारी कारखान्यांचा समावेश होता. चालू हंगाम २०२३-२४ या वर्षाचा गाळप हंगाम लवकरच सुरू होत आहे.

यासाठी विभागातील २९ साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यात २१ खासगी, तर आठ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

परंतु राज्याच्या साखर आयुक्तांकडून ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकित दिली नाही, तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे पैसे भरले नाहीत अशा कारखान्यांना परवाना नाकारला आहे. ज्या कारखान्यांनी अटीची पूर्तता केली आहे,

अशा विभागातील केवळ ११ कारखान्यांना गाळप परवाना मिळाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली. ...यांना दिला गाळप परवाना यात जी-७ शुगर (जुना गंगाखेड शुगर), सिद्धी शुगर लि., श्रीसंत शिरोमनी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना लि., शुभाष शुगर, शिरुर शुगर, योगेश्‍वरी शुगर, एमव्हीके शुगर, कुंटूरकर शुगर, रेणुका शुगर, बळीराजा शुगर व रेणा शुगर या कारखान्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT