Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जनावरं जगवायला तरी पाणी सोडा

Water Shortage : वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ‘आम्हाला जनावरे जगवण्यापुरते तरी योजनेचे पाणी सोडा’ अशी आर्त हाक या भागातील शेतकरी प्रशासनाला घालू लागले आहेत.

Team Agrowon

Pune News : पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचे काम होऊन योजना सुरू झाली. सव्वा महिना होऊनही अद्याप पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या शेवटी असणारी राजुरी, पोंढे, महाले वस्ती, मामावाडी या परिसरात पाणी पोचले नाही.

वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ‘आम्हाला जनावरे जगवण्यापुरते तरी योजनेचे पाणी सोडा’ अशी आर्त हाक या भागातील शेतकरी प्रशासनाला घालू लागले आहेत.

योजना सुरू झाल्यानंतर त्याबाबत आढावा बैठक घेऊन योजनेचे पाणी पाणीपुरवठा स्रोत व जनावरांच्या पाण्यासाठी प्राधान्याने देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यामुळे सर्वच गावातील लाभ धारक शेतकऱ्यांना आता उन्हाळ्यात जनावरांचा पाणी व चाऱ्याचा प्रश्न मिटेल असे वाटले होते.

मात्र, प्रत्यक्षात योजना सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी जाऊनही योजनेच्या लाभार्थी भागातील टेलला पाणी पोचले नाही. यामुळे शेतीसह जनावरांच्याही पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गावांना मिळालेला पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगतचा नाला वगळता अद्याप गावात कुठल्याही शेतकऱ्याला जनावरांसाठी मागणी करून ही पाणी मिळत नाही. याबाबत ग्रामस्थ आपापल्या जवळील पुढाऱ्यांकडे हेलपाटे मारत असताना देखील महिनाभरात त्यांना आश्वासनापलीकडे काहीच मिळू शकले नाही. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

जनावरांना पिण्यासाठीच पाणी नसल्याने चाऱ्याचा प्रश्न तर मोठ्या प्रमाणात आ वासून बसला आहे. योजनेच्या लाभार्थी भागातील काही ठिकाणी उसासारख्या पिकांना पाणी मिळत असताना आम्हाला जनावरांसाठी पाणी का मिळत नाही.

यामुळे या भागातील पशुपालक शेतकरी संतप्त झाले आहेत. आम्ही योजनेच्या टोकाला आहे हा आमचा दोष आहे का असा सवाल देखील या भागातील शेतकरी करू लागले आहेत.

पुरंदर योजनेचे पाणी तातडीने टेल भागात न सोडल्यास जनावरांसह पुरंदर उपसा योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून पशुपालक बसणार आहेत. महिनाभरात पाच वेळा वेगवेगळ्या तारखांना पाणी सोडण्याचे आश्वासन देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
- सुनील यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य, माळशिरस
उन्हाळ्यामुळे पाण्याची सर्वत्र मागणी जास्त असल्याने एकावेळी सर्वांना नियोजन करता येणे शक्य होत नसल्याने पाणी देण्यात मागे पुढे होत आहे मात्र उद्यापासून पुढील टेलच्या भागांमध्ये दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल.
- नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा सिंचन योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT