Rabi Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडा

Rabi Season : रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपिकाला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नियोजनाप्रमाणे आवर्तन सोडावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे, आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, लहू कानडे, डॉ. किरण लहामटे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

विखे म्हणाले, की नगर जिल्ह्यातील जलप्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. पिण्याला, उद्योगांना पाणी आरक्षित करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीपिकालाही वेळेनुसार पाणी मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.

जलप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच पाणी शेतपिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यकतेनुसार चाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून घेण्यात यावी पाण्याचा अनधिकृतपणे उपसा होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी. या वेळी मुळा कालवा, निळवंडे, भंडारदरा गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचा विस्तृतपणे आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT