Milk Price Protests agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price Protests : सातवा दिवस दूध उत्पादकांसाठी, विधीमंडळाचा दारात महाविकास आघाडीची निदर्शने

Milk Price Protests : 'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी ' अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

sandeep Shirguppe

Mahavikas Aghadi Aggressive Milk Rate : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन 'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी ' अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

दूध भुकटी धोरण, शेतकऱ्यांचे होते मरण, अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना द्या हक्काचे दर , अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव, दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला घेरले.

तर विधानसभेलाही फटका : राजू शेट्टी

‘‘शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. राज्यात सत्तेवर कोणाचेही सरकार असो. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारणे हे आमचे कर्तव्यच आहे. शेतकऱ्यांची मागणी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे अशी आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

‘‘गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या शेतीमाल व दुधाच्या बाजारभावासाठी माझा संघर्ष सुरू आहे. पशुखाद्याचे वाढलेल्या दरामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना सावरण्यासाठी दुधाला योग्य बाजारभाव देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. दुधाला अनुदान देताना जाचक अटी लावू नका. विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका. दुधाच्या भावाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे दुधाने अंघोळ घालण्याचे आंदोलन करावे लागेल. शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे असेही शेट्टी म्हणाले.’’

दूध दरावर थेट परिणाम

देशभरात मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारकडून दूध पावडरच्या आयातीला परवानगी दिली आहे. अपेक्षित दर नसल्याने पावडर विक्री तोट्यात करावी लागत आहे. त्यातच केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने देशातील दूध दरावर थेट परिणाम तर होण्याची शक्यता आहे. तसेच देशात सुमारे दोन लाख टन आणि महाराष्ट्रात सुमारे २० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे.

कोरोना दरम्यान दूध पावडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानंतर, पुन्हा खुला बाजार सुरू झाला आहे आणि दरात मोठी घसरण झाली. प्रतिकिलोचे दर ३३० वरून १८० ते १९० रुपयांपर्यंत खाली आले होते. आता दरात हळूहळू सुधार होऊन ते २०५ ते २३० रुपयांपर्यंत आहेत; मात्र, हेच दर २६० ते २७० पर्यंत असल्याशिवाय दूध पावडर विक्री करणे कोणत्याही दूध संघाला परवडत नाही. त्यामुळे साठा करून ठेवावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT