Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

Kolhapur Radhanagari : तुळशी-धामणीसह भोगावती क्षेत्रातील भूस्खलनप्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी,’ असे आवाहन करण्यात आले आहे.
Landslides In Kolhapur
Landslides In Kolhapuragrowon

Kolhapur Landslide : कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाने जोर धरला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा राधानगरी तालुक्यात होत असतो. मागच्या चार दिवसांत राधानगरी तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. यामुळे डोंगरी भागातील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. भूस्खलानाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाकडून वेळीच खबरदारी घेतली जात आहे.

'पाच वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये भूस्खलनामुळे मोठी हानी झाली होती. त्यामुळे तुळशी-धामणीसह भोगावती क्षेत्रातील भूस्खलनप्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी,’ असे आवाहन प्रांताधिकारी सचिन बनसोडे आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील अनेक डोंगर भाग खचले होते. धामणी परिसरातील कुपलेवाडी येथे झालेल्या भूस्खलनामध्ये एका कुटुंबातील दाम्पत्य व तीन जनावरे गाडली होती. शिरगावमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. अनेक ठिकाणी डोंगराच्या दरडी कोसळल्या होत्या.

राधानगरी शेजारच्या पाटपन्हाळा भागातील डोंगर आणि राज्यमार्गावरील गैबी घाटात सुमारे अर्धा किलोमीटरचा डोंगर खचून रस्त्यावर आला होता. बऱ्याच ठिकाणी डोंगरांना भेगा पडल्या. भविष्यात अतिवृष्टी झाल्यास या भेगांमध्ये पाणी शिरून भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवालही भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिला आहे. भूस्तर हाललेला हा परिसर मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यानंतर जागा सोडतो, त्यामुळे अशा ठिकाणच्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दक्ष राहण्याचा अहवालही दिला आहे.

Landslides In Kolhapur
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात ७३ पदे रिक्त, पशुधनाच्या पर्यायाने शेतकरी अडचणीत

तालुक्याला गेल्या चार दिवसांत पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. तुळशी परिसरात गेल्या २४ तासांत २०० मि.मी. चा टप्पा पार केला, तर काळम्मावाडी परिसरात शंभरी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत पाऊस वाढत राहिल्यास भूस्खलन होण्याची स्थिती गंभीर असते. त्यामुळे भूस्खलनप्रवण क्षेत्रातील कुपलेवाडी, म्हासुर्ली, शिरगाव, पाटपन्हाळा, आडोली, वाकीघोल या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना प्रांताधिकारी बनसोडे व तहसीलदार देशमुख यांनी सुरक्षित राहण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

भूस्खलनापूर्वीचे निसर्गातील बदल

- भूस्खलनापूर्वी किमान काही तास आधी त्या परिसरातील झाडे, विद्युत खांब कलतात.

- नव्याने ओघळ सुरू होतात.

- पूर्वीच्या पाण्याच्या ओघळांमधून पाण्याची गती अचानक वाढते.

- पाणी गढूळ यायला सुरुवात होते.

- ओढ्या-नाल्यांचे झरे अचानक गरम वाटू लागतात. घराच्या पायातून किंवा घरातून उघळ फुटतात.

- प्रमाणापेक्षा अधिक प्रवाह वाढतात.

- पक्षी, वन्यप्राणी बिथरतात. त्यांच्या हालचाली जाणवू लागतात.

- गोठ्यातील गाई-म्हशींच्या वर्तनात विलक्षण बदल घडतात.

संभाव्य भूस्खलनप्रवण गावे

कुपलेवाडी, म्हासुर्ली, शिरगाव, पाटपन्हाळा, आडोली, वाकीघोल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com