Onion Milk Movement  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Milk Rate Movement : पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने लंके यांचे ठिय्या आंदोलन स्थगित

Agitation Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर रविवारी (ता. ७) कांदा व दूधदराच्या प्रश्नावरील ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

Team Agrowon

Nagar News : नगर-कांदा व दूधदराच्या प्रश्नासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर रविवारी (ता. ७) स्थगित करण्यात आले.

राज्यातील खासदारांना एकत्र करून संसदेत याबाबत आवाज उठवणार असल्याचे या वेळी खासदार लंके यांनी स्पष्ट केले. दुधाला हमीदर कायदा लागू करावा तसेच कांदा निर्यात बंदी उठून कांद्याला दर द्यावा यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नगरचे खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.५) आंदोलन सुरू केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारावे अशी त्यांची मागणी होती, मात्र जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी न आल्यामुळे खासदार लंके तसेच सर्व आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. पालकमंत्र्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या ऐकून घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे रविवारी (ता.७) जाहीर करण्यात आले होते.

नीलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. रविवारी रात्री उशिरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आंदोलन स्थळी आले. त्याच वेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आलेले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT