Nilesh Lanke Protest : विखेंच्या आश्वासन, लंकेंचं आंदोलन स्थगित; जयंत पाटलांच्या मध्यस्तीनंतर निर्णय

Radhakrishna Vikhe Patil : राज्यात दूध दरावरून शेतकरी आक्रमक झाला असतानाच खासदार निलेश लंके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. लंके यांनी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू केले. अखेर या आंदोलनाची दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांना घ्यावी लागली.
Nilesh Lanke Protest
Nilesh Lanke ProtestAgrowon

Pune News : कांदा आणि दुधाच्या दरावरून राज्यातील शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी देखील सरकार विरोधात दंड थोपटत जनआक्रोश आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे ऐण पावसाळी अधिवेशनात सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे झाले होते. यादरम्यान खासदार लंकेंसह गणोरे गावातील सुरू असणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी कांदा आणि दुधाच्या दरावरून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तर लंके यांचे आंदोलन स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली.

लंकेंचे तिसऱ्या दिवशी आंदोलन स्थगित

राज्यातील कांदा आणि दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. त्यामुळेच आज कांदा आणि दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यावरून कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जनआक्रोश आंदोलन सुरू केले होते. तर या आंदोलन महाविकास आघाडीचे नेते देखील सहभागी झाले होते. गेल्या तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनास अखेर लंके यांनी स्थगिती दिली.

Nilesh Lanke Protest
Nilesh Lanke : 'भीक नको, हक्काचं द्या'; लंके यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

याआधी विखे पाटील यांनी अकोल्यातील आंदोलनास्थळी जात आंदोलन स्थगित करण्याची मागणी करताना लंके यांच्याशी चर्चा करू असे म्हटले होते. त्यानंतर विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना त्यांच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सरकारला यासाठी थोडा वेळ लागेल. लंके यांनी वेळ द्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. त्यानंतर जनआक्रोश आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी विखे-पाटील म्हणाले, दुधाच्या दरासंदर्भात याआधीच सभागृहात निवेदन केले आहे. त्यामुळे पुन्हा बाहेर याची माहिती देणे योग्य नाही. मात्र पुन्हा एकदा सरकार फेरविचार करू. पण याला वेळ लागेल. एका दिवसात असे निर्णय घेता येणार नाही. खासगी दूध संघाने संकलन बंद केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. तर कांद निर्यात बंदी केंद्र सरकारने हटवल्याचे विखे-पाटील म्हणाले.

Nilesh Lanke Protest
Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

यावरून लंके यांनी, मंत्री महोदयांनी आंदोलनकर्त्यांकडे वेळ मागितली. यात काही तांत्रिक अडचणी असतील. तर सध्या अधिवेशन सुरू असल्याने घोषणा देखील करता येत नाही ही अडचण आम्हाला कळते. पण दुधाला अनुदान देण्यापेक्षा दुधालाच भाव वाढून द्या, दूधाची भेसळ रोखावी अशी मागणी लंके यांनी केली. दरम्यान त्यांनी विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवले.

गणोरे गावातील आमरण उपोषण मागे

दुधाला ४० रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांचे गेल्या सात दिवसापासून या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. अखेर पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तर यावेळी दुधाला हमीभाव देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले. यावेळी आंबरे आणि दराडे या दोघांनी आपले आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. तर या आंदोलनास अकोले तालुक्यातील ११ गावांनी आपला पाठिंबा दिला होता. तर कडकडीत बंद पाळून सरकराचा निषेध नोंदवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com