Agriculture Management Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Management : जमीन, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे...

Water and Soil Management : जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिकांची फेरपालट करावी. याचबरोबरीने शून्य मशागत तंत्राचा अवलंब, जमिनीवर आच्छादन महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

Water and Soil Conservation : अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर त्याचप्रमाणे विविध प्रकारचे रासायनिक घटक जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक आरोग्य बिघडत आहेत. त्याचा पीक उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे.

जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव असल्याने पीक तसेच मानवी पोषणावर परिणाम होत आहे. रासायनिक खतांचा अमर्याद वापर केल्याने पाणी व जमिनीत प्रदूषण होत आहे. वाढते वैश्विक तापमान, हवामान बदल, वाढता जमिनीचा ऱ्हास यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे.

जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिकांची फेरपालट, शून्य मशागत पद्धती, जमिनीवर आच्छादन महत्त्वाचे आहे. जमिनीची धूप, प्रदूषण थांबवून जल,मृद्संधारण आवश्यक आहे. अयोग्य पाण्याचा वापरामुळे जमीन निकृष्ट होत आहे. जमीन क्षारपड होऊन उत्पादकता कमी होत आहे.

त्यामुळे पाण्याचा संतुलित वापर महत्त्वाचा ठरणार आहे. जमिनीची खालावलेली उत्पादन क्षमता, क्षारयुक्त जमिनी, चोपणयुक्त, आम्लयुक्त, चुनखडीयुक्त, जमिनीची धूप,सेंद्रिय कर्ब कमी होणे, अन्नद्रव्यांचा असमतोल, जमिनीतील कमी होणारी जैवविविधता याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होताना दिसतो. यासाठी जमिनीच्या भौतिक,जैविक आणि रासायनिक स्थितीकडे सर्वांनी लक्ष द्यावे.

सुपीकता कमी होण्याची कारणे :

खतांचा अनियंत्रित वापर.

माती परीक्षणाचा अभाव.

सेंद्रिय खतांचा कमी वापर.

पीक फेरपालटीचा अभाव.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराबाबत अनास्था.

उपाययोजना :

माती परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर.

जिवाणू संवर्धकांचा वापर.

शेतीची बांधबंदिस्ती. जल,मृद संधारणाचे उपाय.

पिकांची फेरपालट.

समस्यायुक्त जमिनीत भुसुधारकांचा वापर.

- उमेश ईखे, ९५१८५७११३८

(सहायक क्षेत्र अधिकारी, भारतीय मृद् व भू उपयोग सर्वेक्षण, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT