Majhi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेस आज बालेवाडीत प्रारंभ

Ajit Pawar : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी शनिवारी (ता. १७) श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Team Agrowon

Pune News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी शनिवारी (ता. १७) श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून, उर्वरित महिलांच्या खात्यावरील येत्या दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा करण्यात होईल, असेही ते म्हणाले.

या राज्यस्तरीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हस्तांतराच्या कार्यक्रमाचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी विधान भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्या वेळी ते बोलत होते.विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमासाठी लांबून महिला येणार असल्याने त्यांच्या येण्या-जाण्याची, भोजन तसेच पाण्याची योग्य व्यवस्था करा. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पुरेशी बैठकव्यवस्था, मोबाइल टॉयलेट, परिसराची स्वच्छता आदी चोख व्यवस्था करावी. महिला भगिनींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT