Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज घरबसल्या भरता येणार

Submit Online Application at Home : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून महिला ऑनलाइन घरी बसल्या दाखल करू शकतात.
CM Majhi Ladki Bahin Yojana
CM Majhi Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून महिला ऑनलाइन घरी बसल्या दाखल करू शकतात. सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत अर्ज देण्याची सुविधा केली आहे.

त्यासोबतच अंगणवाडीसेविका, बचतगट, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून महिलांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी अर्ज ५० रुपये त्यांना दिले जाणार असल्याने महिलांनी अर्ज भरण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

CM Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana : ‘झिरो बॅलन्स’ने उघडा नवीन खाते

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची व्याप्ती वाढविण्यासोबतच अंमलबजावणीत सुटसुटीतपणा यावा, या दृष्टीने शासनाने नवीन शासन निर्णयाद्वारे बदल केले आहेत. गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून, समितीमार्फत दर शनिवारी चावडी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन होणार आहे.

CM Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ७९ हजार महिलांची नोंदणी

या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची कोणतीही फरपट होऊ नये, त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू नये, यादृष्टीने ‘नारी शक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारे महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, या दृष्टीने शासनाने विविध पावले उचलले आहेत.

अचूक माहिती आवश्‍यक

अर्ज भरताना आधारकार्ड, बँक खात्याशी संबंधित माहिती अचूक भरावी. जेणेकरून लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ होईल. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल. याबाबत ग्रामस्तरावर खात्री करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सर्व ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी व क्षेत्रीय यंत्रणांना दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com