डॉ. नीलेश खाडे
Animal Disease : या वेळी प्रयोगशाळेत केले जाणारे आजारांचे निदान फायद्याचे ठरते. प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापरामुळे जिवाणूंचा प्रतिजैविक प्रतिकार हा जास्त प्रमाणात तयार होत आहे. यामुळे जनावर उपचारांना प्रतिसाद देत नाही. तसेच जिवाणूंचा प्रतिजैविक प्रतिकार हा मानवी आरोग्यासाठी देखील घातक ठरू शकतो.
निदान करण्याचे फायदे
वेळेवर आजारांचे निदान होऊन उपचारांची दिशा मिळते.
योग्य उपचार झाल्यामुळे औषध आणि उपचारांवरील अवाजवी खर्च टाळता येऊ शकतो.
जनावर लवकर बरे होऊन दूध उत्पादन वाढते.
अनावश्यक औषधे टाळल्यामुळे जनावरांचा शारीरिक ताण कमी होतो.
नमुना तपासणी
संपूर्ण रक्तविश्लेषण
रक्त तपासणीमध्ये हिमोग्लोबीन, विविध पेशी आणि परोपजीवीबद्दल माहिती.
थायलेरिया, बबेशिया, अॅनाप्लाझ्मा, ट्रीपॅनोझोमा इत्यादी गोचिडांद्वारे प्रादुर्भाव होणाऱ्या आंतरपरजीवींचे निदान.
जैवरासायानिक घटक तपासणी
रक्तातील कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, रक्तातील साखर आदी घटकांची कमतरता तपासता येते. या घटकांची कमतरता असल्यास गरजेनुसार उपचार करता येतात. यकृत आणि मूत्रपिंड कार्यक्षमता तपासण्यासाठी रक्तजल वापरले जाते.
रक्तजलाच्या इलिसा, वेस्टर्न ब्लॉटिंग यांसारख्या आधुनिक तपासण्यातून ब्रुसिल्लोसिस, घटसर्प, लाळ्या खूरकूत, फऱ्या अशा जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजाराचे निदान होते.
प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी
प्रतिजैविकांच्या होणाऱ्या अमर्याद वापरामुळे जिवाणूंमध्ये प्रतिजैविक औषध प्रतिकार निर्माण होत आहे त्यासाठी प्रतिजैविक संवेदनशीलता
चाचणी महत्त्वाची ठरते. ही चाचणी करून कासदाह, गर्भाशयातील संसर्ग आणि इतर बऱ्या न होणाऱ्या जखमांसाठी योग्य प्रतिजैविक जाणून घेता येते.
या चाचणीद्वारे प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर टाळता येतो आणि होणारा खर्च कमी होतो.
लघवी तपासणी
मूत्रमार्गाचे आजार, मूत्राशयाचा दाह, किटोसिसचे निदान करता येते.
शेण तपासणी
कोणत्या प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव झाला आहे हे जाणून घेऊन जंतनिर्मूलन करता येते.
ओजरस तपासणी
जनावरांतील वांझपणा, वारंवार उलटणे याची करणे जाणून घेण्यासाठी जनावरांना विषबाधा झाल्यास चारा, पाणी, चारा तपासणीतून विषबाधेचे कारण शोधता येते.
कोणत्या घटकांमुळे विषबाधा झाली आहे हे जाणून घेऊन उपचार करता येतात. बाधित चारा ओळखता येतो.
सूक्ष्मजीव तपासणीमध्ये जिवाणू, बुरशी ओळखून त्यांना अनुसरून उपचार करता येतात.
प्रयोगशाळेसाठी लागणारे नमुने
रक्त
गोचीड ताप, हिमोग्लोबिन आणि विविध पेशी
जाणून घेण्यासाठी, सुप्तावस्थेतील आजारांचे
एकत्रित निदान करण्यासाठी मानेच्या शिरेतून काढलेले रक्त ईडीटीए किंवा सायट्रेटेड बाटलीतून पाठवावे.
गोचीड ताप तपासणीसाठी कानाच्या शिरेतील रक्ताच्या थेंबापासून काचपट्टीवर बनवलेला पातळ थर प्रयोगशाळेत पाठवावा.
रक्तजल
जैवरासायनिक घटक तपासणीसाठी रक्त गोठल्यावर वेगळे होणारे जल वापरले जाते.
दूध
कासदाह आजारामध्ये प्रभावी प्रतिजैविक जाणून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीसाठी बाधित सडाचे दूध निर्जंतुक बाटलीतून पाठवावे.
शेणाचा नमुना
सुप्तावस्थेतील आजार तपासणी. साधारण ५० ग्रॅम.
त्वचेचे आजार
ओळखण्यासाठी त्वचेचे वरखड.
ओजरस
वांझपणा, वारंवार उलटण्याचे कारण जाणून घेण्यासाठी ओजरस पाठवावा.
जखमेतील स्राव
बऱ्या न होणाऱ्या जखमेच्या प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीसाठी जखमेतील स्राव, पू निर्जंतुक केलेल्या बाटलीतून पाठवावा.
चारा
विषबाधेचे कारण तपासणीसाठी चाऱ्याचा नमुना पाठवावा.
तपासणी लागणारा नमुना
हिमोग्लोबिन, रक्तातील विविध पेशी आणि परजीवी रक्त
कासदाह, प्रभावी प्रतिजैविक तपासणी दूध
रक्तातील साखर, कॅल्शियम, मॅग्नेशिअम , फॉस्फरस, पोटॅशिअम सिरम (रक्तजल)
यकृत कार्यक्षमता चाचणी आणि मूत्रपिंड कार्यक्षमता चाचणी सिरम (रक्तजल)
किटोसिस लघवी
जंत तपासणी शेण
ब्रुसेलोसिस, घटसर्प, लाळ्या खुरकूत, फऱ्या,
जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार सिरम (रक्तजल)
सुप्तावस्थेतील तसेच एकत्रित आजार रक्त, शेण
त्वचा आजार त्वचेचे वरखड
वांझपणा, वारंवार उलटणे रक्त, रक्तजल, ओजरस
विषबाधा चारा, पाणी, लघवी,
पोटातील चारट
नमुना पाठवताना घ्यावयाची काळजी
रक्ताबरोबरच जनावरांची लक्षणे आणि इतर इतिहास तसेच जनावरावर करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारांची माहिती दिल्यास रोगनिदान करण्यास मदत होते.
रक्ताचा नमुना घेताना रक्त काढण्याची जागा स्पिरिटने स्वच्छ करून घ्यावी.
रक्त तपासणीसाठी गाठविरोधी रसायन (ईडीटीए/ सायट्रेटेड) असलेल्या बाटलीमध्ये पाठवावे. नमुना बाटलीत टाकल्यानंतर गाठविरोधी रसायन रक्तामध्ये मिसळण्यासाठी बाटली हलक्या हाताने व्यवस्थित हलवावी.
रक्तजल तपासणीसाठी नमुना बाटलीमध्ये टाकल्यानंतर बाटली ४५ अंशांच्या कोनामध्ये उभी करून ठेवावी म्हणजे रक्तजल व्यवस्थित वेगळे होईल.
दूध, शेण, लघवी, सोट तपासणीसाठी पाठवताना निर्जंतुक केलेल्या बाटलीतून पाठवावे.
नमुना घेताना त्यात बाहेरची घाण मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
कासदाहसाठी दूध पाठवताना कास चांगली स्वच्छ करावी. सुरुवातीच्या काही धारा काढून टाकाव्यात आणि नंतरचा नमुना घ्यावा.
जमिनीवर पडलेला लघवी, शेण, सोट तपासणीसाठी घेऊ नये.
नमुना जमा करताना निर्जंतुक बाटलीचे तोंड जास्त वेळ उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी.
नमुन्यावर जनावराचे नाव किंवा क्रमांक, पशुपालकाचे नाव, पत्ता टाकावा.
जमा केलेला नमुना लवकरात लवकर प्रयोगशाळेत पोहोचवावा.
- डॉ. नीलेश खाडे, ९०७५५५६५५३ (लेखक पशुवैद्यक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.