Goat Disease : शेळी,मेंढीतील विषाणूजन्य आजार

Goat Farming : व्यवस्थापनामधील त्रुटीमुळे शेळ्या, मेंढ्यांना आजार होतात. यासाठी गोठ्याची स्वच्छता, खाद्य, प्रजनन, गाभणपणातील काळजी, लहान पिलांची काळजी आणि वेळेवर लसीकरण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
Goat Farming
Goat Farming Agrowon

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ.गोकूळच सोनावणे

Goat Rearing : व्यवस्थापनामधील त्रुटीमुळे शेळ्या, मेंढ्यांना आजार होतात. यासाठी गोठ्याची स्वच्छता, खाद्य, प्रजनन, गाभणपणातील काळजी, लहान पिलांची काळजी आणि वेळेवर लसीकरण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विषाणूजन्य आजारांवर तत्काळ औषधोपचार उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच उपाय आहे.

लाळ्या खुरकूत
- सर्वसाधारणपणे सुप्त अवस्थेमधील प्रकार शेळी,मेंढीमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. दोन आठवड्यांपेक्षा लहान करडांमध्ये अधिक प्रमाणात लक्षणे दिसतात.
- तोंडामध्ये फोड येतात,जखमा होतात. ४० टक्के शेळ्या,मेंढ्यांमध्ये पायावर फोड, जखमा होतात.
- सुरवातीस दोन्ही खुरांमध्ये किंवा खुराच्यामधील भागात फोड येतात. काही शेळ्या,मेंढ्यांमध्ये तोंडात फोड येतात. त्यामुळे लाळ गळणे किंवा जीभेने लाळ चाटणे, ताप येणे, इत्यादी लक्षणे दिसतात.
- जीभ, टाळू,ओठांवर फोड, जखमा असल्यामुळे त्यांना खाता येत नाही.
- काही नवजात अर्भके कोणतेही लक्षणे न दाखवता अचानकपणे दगावतात. प्रामुख्याने हृदयात होणाऱ्या विकृतीमुळे नवजात अर्भकामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते.

उपचार :
- तोंड, पायांवरील जखमा पोटॅशियम परमॅंग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात.
- जखमांवर ग्लिसरीन तसेच जंतूनाशक मलम लावावे.
- पशुवैद्यकाकडून तातडीने उपचार करावेत.
- आजारी शेळ्या, मेंढ्यांना चांगल्या उत्तम प्रतीचे मऊ खाद्य आणि पाणी पाजावे.
प्रतिबंध :
- संसर्ग झालेल्या शेळ्या,मेंढ्यांना कळपामधून वेगळे करावे. नवीन कळपात समावेश करू नये.
- कोणतेही खाद्य, वस्तू, माणसे जे संसर्ग झालेल्या शेळ्या,मेंढयाच्या संपर्कात आले असेल ते निरोगी शेळ्या,मेंढयांपासून दूर ठेवावेत.
- ओएसी टाइप लस वापरावी.वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे.

Goat Farming
Goat Disease : पीपीआर ः एक विषाणूजन्य आजार

देवी :
- आजार वेगवेगळ्या प्रकारात आढळतो. ओठ, नाकपुड्या, कान तसेच शेपटीखाली व्रण दिसतात.
- प्रादुर्भाव झाल्यानंतर २ ते १४ दिवसानंतर लक्षणे दिसायला सुरवात होते. याचा फैलाव कळपातील ९० टक्के शेळ्या, मेंढ्यांमध्ये होतो.
- प्रथमत: अधिक ताप येतो, जनावर मलूल होते, पडून रहाते. नाक,डोळ्यातून स्त्राव येतो.
- केस नसणाऱ्या भागात व्रण येतात. करडांमध्ये प्रमाण अधिक असते.
उपचार :
- निश्‍चित कोणताही उपचार उपलब्ध नाही. व्रण साफ करावेत, त्यावर मलम लावावे.
- पशुवैद्यकाच्या सहाय्याने इतर उपचार करून घ्यावेत.

प्रतिबंध :
- सांसर्गिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागातून खरेदी करू नये.
- देवीची लस दरवर्षी नियमितपणे एप्रिल किंवा डिसेंबर महिन्यात द्यावी.

Goat Farming
Goat Rearing : इंजिनिअर तरुणाचा शेळी- कुक्कुटपालनात ठसा

निलजिव्हा
- प्रसार हा प्रामुख्याने क्युलिकोइड्स या कीटकांच्या चावण्यामुळे होतो.
- विषाणू प्रामुख्याने रक्तपेशी निर्मिती करणाऱ्या उती आणि विविध अवयवातील रक्तवाहिन्यांना अपाय करतो. त्यामुळे अतितीव्र, तीव्र, कमी तीव्र आणि जुनाट अशा स्वरूपाची लक्षणे आढळतात.
- प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारणतः ३ ते ६ दिवसांत लक्षणे दिसण्यास
सुरवात होते.
- सुरवातीला १०५ ते १०७.५ अंश फॅरनहाइट इतका ताप येतो.
- प्राथमिक अवस्थेत ओठांवर सूज येते. बाधित शेळ्यांच्या नाकातून पाण्यासारखा स्राव बाहेर येतो. कालांतराने हा स्राव पिवळा होऊन त्वचेस चिकटून राहतो.
- बाधित शेळ्यांचे वजन झपाट्याने कमी होते. जबड्याच्या वरच्या हिरड्या, जिभेच्या टोकावर व्रण दिसू लागतात.
- प्रादुर्भावाची तीव्रता अधिक असल्यास, बाधित मेंढ्या तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. त्यांच्या नाकावाटे फेसाळ स्राव वाहू लागतो.
- चेहऱ्यावर खालचा भाग, कान आणि जबड्याच्या भागावर सूज येऊन तो लालसर भासू लागतो.
- गिळताना त्रास होतो. श्वास घेताना मोठ्याने घरघर ऐकू येते. शेळ्यांना वारंवार हगवण होते.

प्रतिबंधात्मक उपाय ः

- पाणी साठून राहणाऱ्या भागात चरायला सोडू नये. कारण अशा ठिकाणी कीटकांची संख्या अधिक असते.
- एखाद्या विशिष्ट भागात साथ आलेली असल्यास प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

मावा :
- देवीप्रमाणे लक्षणे असणारा विषाणूजन्य आजार शेळ्या,मेंढयामध्ये प्रामुख्याने करडांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
- काळसर पापडी पकडलेल्या जखमा नाकाच्या भोवती जास्त प्रमाणात आढळतात. आजाराच्या जखमा कास, शरीराच्या इतर भागात दिसतात. ताप येतो, चारा कमी खातात.
- आजार एकदा झाला की,त्याच शेळी,मेंढीमध्ये परत आढळून येत नाही.

प्रतिबंध :
- आजार विषाणूजन्य असल्यामुळे निश्‍चित उपचार नाही. प्राथमिक उपचार म्हणून जखमांवर बोरोग्लिसरीन लावावे.
- आजारी शेळ्या,मेंढ्या वेगळ्या ठेवाव्यात. आजारी शेळ्या,मेंढ्यांवर उपचार करावेत.
- दरवर्षी प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.


पीपीआर :
- आजार अतिशय सांसर्गिक असल्यामुळे एकाच वेळी तो अनेक शेळ्या,मेंढ्यांना झालेला दिसतो. मरतुकीचे प्रमाण अधिक आहे.
- ताप येतो, नाका-डोळ्यातून पाणी गळते, डोळ्यातून चिपडे येतात. डोळयाभोवती चिकटून बसतात. तोंड व चेहरा सुजतो. हगवण लागते, तोंडाच्या आतील भागात ओठांमध्ये व्रण दिसून येतात.
- श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होतो किंवा खूप जलद श्‍वास घेतात.
- पांढऱ्या रक्तपेशीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. मरतुकीचे सर्वसाधारण प्रमाण ९० टक्के असते.
प्रतिबंध :
- लक्षणावरुन पशुवैद्यकीय उपायासहीत योग्य काळजी घेतली तर, मरतुक कमीत कमी ठेवता येते.
- आजारी शेळ्या,मेंढ्यांना कळपातून वेगळे करावे.
- आजाराने मृत्यू पावलेल्या शेळ्या,मेंढ्यांना जाळावे किंवा योग्य पद्धतीने जमिनीत गाडावे. जेणेकरून प्रादुर्भाव दुसऱ्यांना होणार नाही.
- दर तीन वर्षानंतर पावसाळा सुरु होण्याअगोदर लसीकरण करावे.

आजाराची कारणे ः
१. जिवाणूंमुळे होणारे आजार.
२. विषाणूजन्य आजार.
३. कृमी/जंतूंमुळे होणारे आजार.
४. खाद्यातील कमतरतेमुळे होणारे आजार.
५. बुरशीमुळे होणारे आजार.
६. चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे होणारे आजार.

- डॉ. विठ्ठल धायगुडे ९८६०५३४४८२
( क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com