Sugarcane Worker Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker Strike : ऊसतोड मजुरांचे ‘कोयता बंद’ आंदोलन

Sugarcane Worker Wage Rate : ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात २०१९ नंतर अद्यापपर्यंत वाढ झालेली नसल्याने ही मजुरी किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी

Team Agrowon

Jalgaon News : ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात २०१९ नंतर अद्यापपर्यंत वाढ झालेली नसल्याने ही मजुरी किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी अशी मागणी असताना या मागणीची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील ऊसतोड मजुरांनी सोमवारपासून (ता. २५) ‘कोयता बंद’ आंदोलन सुरू केले आहे.

ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरु असेल त्या त्या ठिकाणी तोडणीचे काम बंद राहील, अशी माहिती ऊस तोडणी मजूर व मुकादम संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील ढोमणेकर यांनी दिली. श्री. ढामणेकर म्हणाले, राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरवाढीच्या कराराचे नूतनीकरण होऊन वर्ष उलटले तरी त्यांना दरवाढ झालेली नाही.

वास्तविक दर तीन वर्षांनी मजुरीच्या दरामध्ये वाढ केली जाते. २०१९ नंतर ही दरवाढ झालेली नसल्याने राज्यातील १५ लाखांहून अधिक ऊसतोड मजुरांवर अन्याय होत आहे. ही दरवाढ ५० टक्क्यांनी करावी अशी या मागणीसाठी सर्वत्र ऊस फडांमध्ये कोयता बंद आंदोलन सुरू आहे.

दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. दरवर्षी महागाई वाढते मग त्या तुलनेत कारखानदार व शासन मजुरी का वाढवत नाहीत? कष्टाचा घामाचा मोबदला दरवर्षी महागाईवर आधारित द्यावा, अशी मागणी आहे.

संघटनेची मागणी

ऊसतोडणी मजुरीचे एकूण चार प्रकार आहेत. यात यंत्राने वगळता डोकी सेंटरसाठी २७३ रुपये प्रती टन, बैलगाडी सेंटरसाठी ३०४ रुपये प्रती टन, टायर असलेल्या बैलगाडीसाठी २३७ रुपये प्रती टन असे सध्या दर दिले जातात.

यात ५० टक्क्यांची वाढ करून कराराचे तत्काळ नूतनीकरण करावे. नूतनीकरण झाल्यानंतर अनुक्रमे ४०९, ४५६ व ३५५ रुपये प्रती टन अशी वाढ होणार असून हिच प्रामुख्याने आमची मागणी, असल्याचे ढोमणेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी

Agriculture Policy: ‘‘महानिर्मिती’तून बांबूला मदत करण्याचे धोरण’

Bamboo Cultivation: मूल्यसाखळीबरोबर बांधकाम, ऊर्जेसाठी बांबूची लागवड गरजेची

Agricultural Equipment Subsidy: यांत्रिकीकरण अनुदानाचे अर्ज रद्द न करण्याचे आदेश

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT