Sugarcane Workers Strike : ऊसतोड कामगारांकडून संपाची हाक, गळीत हंगामांची लागणार वाट!

Sugarcane Harvesting season : हार्वेस्टरप्रमाणेच ऊस तोडणी मजूरांनाही प्रतिटन ४०० रुपये द्या, या मागणीसाठी ऊसतोड मजूर संघटनांनी संपाची हाक दिली आहे.
Sugarcane worker protest
Sugarcane worker protestAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Sugarcane Workers : यंदा ऊसाच्या गळीत हंगामास नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी संघटनांनी १ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने खामगाव ते पंढरपूर महामार्गावर माजलगाव जि. बीडमध्ये रास्तारोको करण्यात आला.

Sugarcane worker protest
Sugarcane Season 2023 : ऊस गळीत हंगाम प्रारंभ तारखेची उत्सुकता

सध्या महाराष्ट्रात ऊसतोडणी मजुरांना प्रति टन २७३ रुपये मजुरी मिळते. तर हार्वेस्टरला ४०० प्रति टन दर मिळत आहे. मात्र, गुजरात, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सरासरी ४०० रुपये प्रतिट टन दर मिळत आहे. त्याच प्रमाणे राज्यात ऊसतोडणी मजूरांना ४०० रुपये प्रति टन दर मिळावा अशी मागणी मजुरांची आहे. तसेच इतर मागणीसाठी राज्यभरातील ऊस तोडणी मजूर संघटना आक्रमक झाल्या आहे.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी देखील या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला आहे.

Sugarcane worker protest
Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र वापरातील अडचणी अन उपाय

यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. १ नोव्हेंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी कारखान्यांनी केली आहे. परंतु मंत्री समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे हंगामाबाबत अनिश्चितता आहे. अशा ऊस तोडणी मंजूर ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून येत्या काळात साखर संघ आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी साखर संघ आणि ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. तो आता संपुष्टात आला असून यंदा नव्याने करार होणार आहे. त्यामुळे महागाई वाढल्याने तोडणी मजुरी, वाहतूकीचा दर वाढवण्याची मागणी आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे महामंडळ हे माथाडी कामगारांच्या धर्तीवर राबवावे आणि मागील करारात ठरल्याप्रमाणे १० रुपये प्रतिटन लेव्ही ऊस तोडण महामंडळाला द्या, त्याशिवाय साखर कारखान्यास परवाना देऊ नये.
जीवन राठोड अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com