Warana Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam Water : कोयना धरण क्षेत्रात १२५ मिमी पाऊस, तर वारणा धरण १०० टक्के भरलं

Koyna Dam Area Rain : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्याला मागच्या २४ तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता.

sandeep Shirguppe

Koyna Dam Satara : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्याला मागच्या २४ तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. त्यामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून, काल(ता. २६) सायंकाळी पायथा वीजगृहातून होणारा पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा १०४.२८ टीएमसी झाला असून, नवजाला येथे गेल्या २४ तासांत सव्वाशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवार व मंगळवारी दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्राला व्यापून टाकले. त्यामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद १६ हजार ३०० नोंदली गेली. सात दिवसांपूर्वी १९ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता पायथा वीजगृह बंद करून पूर्ण थांबवलेला विसर्ग काल गुरूवार सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात आला असून, कोयना नदीपात्रात दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान कोयना परिसरात ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. होत असलेल्या पावसाने सातारा परिसरातील खरिपाची पीके लांबणीवर अजून काही दिवस ठप्प राहणार आहेत. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १०५ (५४७७) मिलिमीटर, नवजाला १२७ (६६८८) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ९० (६३११) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वारणा धरणातून १३५० क्यूसेक विसर्ग

शिराळा तालुक्यात व धरण पाणलोटक्षेत्रात आज पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत निर्मितीतून १३५० क्युसेकने विसर्ग सुरू करून पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.

मागील चार दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने काढणीसाठी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भात काढणी व मळणी खोळंबल्या आहेत. गेले आठवडाभर पावसाने उघडीप दिली होती. काल दिवसभर उघडीप होती. मात्र, आज दिवसभर हजेरी लावली. धरण परिसरात २४ तासांत १९ तर आठ तासांत २० अशी आजअखेर एकूण ३७८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Group Farming: शेतकऱ्यांनी गटाद्वारे फळपिकांची लागवड करावी

Industrial Development: सू्क्ष्म, मध्यम उद्योग बळकटीकरण,निर्यातवृद्धीवर हिंगोलीत कार्यशाळा

Soybean Prices: नांदेडमध्ये प्रक्रिया उद्योगांचे सोयाबीन दर ‘एमएसपी’नजीक

Gram Panchayat: ग्रामपंचायत कर वसुली सवलतीस मुदतवाढ द्या

Mango Flowering: विक्रमगड तालुक्यात आंबा पीक मोहरले

SCROLL FOR NEXT