Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : ‘ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो’तील विजेत्याला ड्रोन वितरण

Agrowon Agri Expo : ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो’ हे प्रदर्शन १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ रोजी मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मैदानावर झाले होते.

Team Agrowon

Sangli News : ‘ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो’ हे प्रदर्शन १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ रोजी मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मैदानावर झाले होते. या चारदिवसीय प्रदर्शनात हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन शेतीतील नवतंत्रज्ञानाची माहिती घेतली होती.

भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक प्रवेशिका भरून घेण्यात आली होती. ‘किसान ड्रोन डॉट कॉम’ या कंपनीने भेट देणाऱ्या भाग्यवान शेतकऱ्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व शेतशिवाराच्या फवारणीसाठी ड्रोन देण्याची घोषणा केली होती.

हजारो प्रवेशिकांतून काढण्यात आलेल्या सोडतीतून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याहस्ते भाग्यवान विजेत्यांची प्रवेशिका सोडतीद्वारे काढण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील तुडीये (ता. चंदगड) येथील सतीश पाटील या युवक शेतकऱ्याला सोडतीतून ड्रोनचे बक्षीस लागले होते. त्यानुसार ‘किसान ड्रोन डॉट कॉम’तर्फे ड्रोन देण्यात आला.

त्याचे वितरण केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांच्याहस्ते ‘सकाळ’च्या सांगली कार्यालयात नुकतेच झाले. ‘किसान ड्रोन डॉट कॉम’ कंपनीचे सौरभ घेवारी, कंपनीच्या आधारस्तंभ श्रद्धा घेवारी, तुंग (ता. मिरज) येथील प्रगतिशील शेतकरी ॲड. वासुदेव कुलकर्णी, ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ व्यवस्थापक ज्ञानदेव मासाळ, तुडिये येथील शेतकरी नवनाथ वाणी आदी उपस्थित होते.

चंदगड तालुक्यातील पहिला ड्रोनधारक शेतकरी होण्याचा मान ‘ॲग्रोवन ॲग्रो एक्स्पो’ने दिला. आमची १०० वर्षांपूर्वीची ५ एकर काजू बाग आहे. शिवाय ४ एकर ऊस आहे. आंतरपीक म्हणून नाचणी, भुईमूग, रताळी लागवड करतो. आमच्या भागात उसावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याची पद्धत अलीकडेच सुरू झाली आहे. ‘ॲग्रोवन’मध्येही यासंदर्भात वाचले होते. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रवेशिका भरून दिली होती. दोनच दिवसांनी सोडतीद्वारे ड्रोन बक्षीस लागल्याचा फोन आला, तेव्हा विश्‍वासच बसला नाही. आज प्रत्यक्ष ड्रोन हातात मिळाला, त्याची उपयुक्तता जाणून घेतली.
- सतीश पाटील, ड्रोन विजेते शेतकरी तुडिये (ता. चंदगड)
‘ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘ॲग्रोवन ॲग्री एक्स्पो’ प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली होती. ‘किसान ड्रोन डॉट कॉम ः ए जेएन पीएस’ कंपनीतर्फे सोडतीतील विजेत्यांना ड्रोन कॅमेरा देण्याची घोषणा केली होती. ऊस, द्राक्षासह अन्य पिकांवर औषध फवारणीसाठी हा ड्रोन अत्यंत उपयुक्त आहे. व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांनी याकडे पाहिल्यास बहुपयोगी असा हा ड्रोन आहे. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान यातून शिकायला मिळत आहे. ‘जीईएन पीएस’ या कंपनीने ती सोय उपलब्ध करून दिली आहे. विविध प्रकारच्या व क्षमतेनुसार कंपनीने बनवलेल्या ड्रोनचा शेतकऱ्यांनी वापर करावा.
- सौरभ घेवारी, मॅनेजिंग डायरेक्टर, जीईएन पीएस कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT