Agriculture Drone Subsidy : ड्रोन फवारणी, स्लरी फिल्टरसाठी देणार अनुदान

Agriculture Drone : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी यंदाचा (२०२५-२६) ५२ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता. १३) सादर केला.
Agriculture Drone Subsidy
Agriculture Drone SubsidyAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके : अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Drone Spraying : अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी यंदाचा (२०२५-२६) ५२ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता. १३) सादर केला. यंदा पहिल्यांदाच स्लरी फिल्टर उपकरण, दूध काढणीयंत्र, पशुधनासाठी मुक्तसंचार गोठा, ड्रोन फवारणी यासारख्या नव्या योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ५ कोटींच्या जवळपास तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेवर काही वर्षांपासून प्रशासक आहे. त्यामुळे यंदाही जिल्हा परिषदेत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गुरुवारी (ता. १३) यंदाचा (२०२५-२६) चा ५० कोटी ५० लाखाचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेवाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Agriculture Drone Subsidy
Drone Subsidy : केंद्र सरकार देणार ड्रोन खरेदीसाठी अनुदान

जिल्हा परिषदेची आरंभीची शिल्लक ६९,९१,६३६ असून जिल्हा परिषदेचा महसूल ४०,४९,४२,६९० व भांडवली जमा ११,३५,५६,१० अशी आरंभी शिलकीसह ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपये आहे. जिल्हा परिषदेच्या महसुलातून ४१ कोटी १३ लाख ५३ हजार ४९० खर्च, ११ कोटी ३५ लाख ५६ हजार १०० रुपये भांडवली खर्च असा ५२ कोटी ४९ लाख ०९ हजार ५९० रुपये व ५ लाख ८० हजार ८३६ रुपये अखेरची शिल्लक मिळून ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांची एकूण खर्च बाजू सादर केली.

यंदाच्या अर्थसंकल्पात ओपन सायन्स पार्क, मिशन पार्क, मिशन आरंभ या शिक्षण विभागातील जुन्या योजना कायम असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ड्रोन फवारणी यंत्र, स्लरी फिल्टर, दूध काढणीयंत्र, पशुधनासाठी मुक्तसंचार गोठा, यासारख्या नवीन योजना आणल्या आहेत. शिष्यवृत्ती योजनांसह शिक्षणाबाबतच्या योजनांना अधिक प्राधान्य दिले आहे. सुरभी सुरक्षा अभियान या वर्षीही राबविले जात आहे. गायी-म्हशींचे पोटातील लोहजन्य वस्तूंपासून प्रतिबंध करण्यासाठी ही योजना आहे. मधाचे गावसारख्या योजनेसाठी मात्र आजीबात तरतूद नाही.

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तरतूद

(कंसात अंदाजे लाभार्थी संख्या)

शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी ः ५५ लाख (२११), मुलींना सायकल पुरवणे ः ६० लाख (१ हजार), मागासवर्गीय मुलींना सायकल ः ३७ लाख (६१६), मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रे पंप ः ५२ लाख (१ हजार ४०), मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर ः५५ लाख (२२०), मागासवर्गीय व्यक्तींना पीठ गिरणी ः ५० लाख (३८४),

दिव्यांगांसाठी पीठ गिरणी ः ३० लाख ३० हजार (२३३), दिव्यांगांसाठी झेरॉक्स मशिन ः ३० लाख ३० हजार (६०), ग्रामीण महिला, मुलींसाठी प्रशिक्षण ः ३३ लाख (६६०), दिव्यांग महिला, बालकांसाठी ः ३ लाख ६५ हजार, स्लरी फिल्टर उपकरण ः १२ लाख ५० हजार (६२), दूध काढणीयंत्र ः २० लाख (१३३), पशुधनासाठी मुक्तसंचार गोठा ः १५ लाख (७५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com