kolhapur rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : दुष्काळी घोषीत झालेल्या तालुक्यात भरपूर पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ८७.१८ टक्के पावसाची नोंद

Rain In Kolhapur : कोल्हापुरातील ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हणून घोषीत करण्यात आले होते त्या तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वर्षी अनेक तालुक्यात पाऊस झाला नसल्याने दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली होती. परंतु यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हणून घोषी करण्यात आले होते त्या तालुक्यत सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. शिरोळ, हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यात दुष्काळ परिस्थिती होती परंतु जोरदार पावसाने नद्यांसह विहीरी भरून वाहत असल्याचे चित्र अनेक तालुक्यात आहे. यंदा जिल्ह्यात ८७.१८ टक्के पाऊस झाल्याची माहिती वेधशाळेकडून दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. सर्वच तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. शिरोळ तालुक्यात आतापर्यंत ४९७ मिमी, तर हातकणंगले तालुक्यात ७६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांमध्ये नेहमीप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिला. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत एकूण पडणाऱ्या पावसापैकी ८७.१८ टक्के पाऊस पडला आहे. पुढील महिन्यात उर्वरित पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

देशभर यावर्षी मॉन्सून शंभर टक्केपेक्षा जास्त पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे आतापर्यंत मान्सून सक्रिय राहिला आहे. त्यामुळे पश्चिम घाटात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही जुलैच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढला. महापूरजन्य परिस्थिती उद्भवली. या काळात धरण क्षेत्राबरोबर मुक्त पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला. त्यानंतरही काही दिवसांचा अपवाद सोडल्यास दमदार पाऊस झाला.

ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम होता. जून ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच भागांत समाधानकारक पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत दुप्पटीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातही पावसाने आपली सरासरी ओलांडली आहे.

करवीर, कागल, गडहिंग्लज येथेही नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १७३३.१ मिमी पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत १३३७.६ मिमी पाऊस पडला आहे. एकूण पावसापैकी ८७.१८ टक्के पाऊस पडला आहे.

जून ते ऑगस्ट महिन्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस (मि.मी. मध्ये)

हातकणंगले ७६५.१, शिरोळ ४९७.५, पन्हाळा १,२९८.१, शाहूवाडी २,२५८.६, राधानगरी १,८०४.८, गगनबावडा ३,१२०, करवीर ९६२.७, कागल ९३४.७, गडहिंग्लज ९३८.८, भुदरगड १,९८५.५, आजरा १,६२१, चंदगड १,७८८, एकूण १,३३७ मिलीमीटर इतका पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

National Jowar Varieties: रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

Fruit Orchard Cultivation: फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

SCROLL FOR NEXT