Jalgaon News: राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरणाच्या पद्धतीत शासनाने फेरबदल केले आहेत. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गव्हासोबत आता मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी गहू, तांदळाचे प्रमाण कमी होणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.शासनाच्या नव्या नियोजनानुसार स्थानिक पातळीवर उत्पादित मका खरेदी करून तो सार्वजनिक वितरण प्रणालीत समाविष्ट केला जाणार आहे. या निर्णयामागे स्थानिक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. .Ration Shop : रेशन दुकानातून मुदतबाह्य रव्याचे वाटप.लाभार्थ्यांना गहू व तांदळाचे प्रमाण कमी करून दिले जाणार असल्याने काही लाभार्थी नाराजी व्यक्त करीत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून, प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मार्चच्या वितरणात मक्याचा सामावेश होणार आहे..Ration Shops : रेशन दुकानातून साडी वाटपाला ‘ब्रेक’.स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा तांदूळ हा अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहाराचा मुख्य भाग आहे. त्यामुळे तांदळाऐवजी मका देण्याच्या निर्णयाबाबत लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे..अंमलबजावणी मार्चपासूनराज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य वितरणातील हा नवा बदल मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला काही भागांत प्रायोगिक स्वरूपात अंमलबजावणी सुरू झाली असून, पुढील काही महिन्यांत टप्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात मक्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुरवठा विभागाकडून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, रेशन दुकानदारांनाही नव्या पद्धतीनुसार धान्य उचल व वितरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.