Sharad Pawar : शरद पवार ३ दिवस कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय घडामोडींना वेग, समरजीत घाटगेंचा प्रवेश निश्चित

Hasan Mushrif VS Sharad Pawar : हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर श्री पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नवी राजकीय समिकरणे आखण्यास सुरूवात केली आहे.
sharad pawar
Sharad Pawaragrowon
Published on
Updated on

Assembly Election 2024 : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या ४ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांची मंदियाळी पहायला मिळणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याने नेते मंडळींची धावपळ पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार हे सलग तीन दिवस कोल्‍हापुरात आहेत. आजपासून (ता. ०२) हा दौरा सुरू होत असून, ४ सप्टेंबरला कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे.

५ सप्टेंबरला सांगलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पवार यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेश तर निश्‍चित आहेच, याशिवाय अन्य काही नेतेही पक्षात प्रवेश करण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्याचे राजकारण हादरून निघणार असल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर श्री पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नवी राजकीय समिकरणे आखण्यास सुरूवात केली आहे.

sharad pawar
KDCC Bank Kolhapur : जिल्हा बँक वाटणार २६ कोटींचा लाभांश, साडेसहा लाख शेतकऱ्यांना फायदा

पवार आज २ सप्टेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरात काही काळ थांबून ते बेळगावकडे जाणार आहेत. बेळगाव येथे श्री. पवार यांच्या उपस्थितीत सहकारमहर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुन्हा कोल्हापुरात येणार आहेत.

३ सप्टेंबरला सकाळी कोल्हापुरात अन्य एक कार्यक्रम आहे, तर सायंकाळी कागल येथील गैबी चौकात होणाऱ्या जाहीर सभेत त्यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे.

३ सप्टेंबरला त्यांचा मुक्काम असून, ४ सप्टेंबरला दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार होणार आहे. यानंतर ते सातारा जिल्ह्याकडे रवाना होतील. पण, ५ सप्टेंबरला पुन्हा ते सांगलीत सोनहिरा साखर कारखान्यावर होणाऱ्या कै. पतंगराव कदम यांच्या स्मारक उद्‍घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. सांगलीतील या कार्यक्रमाला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com