Pune News: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. आज आणि उद्याही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .मराठवाड्यातील धाराशिवसह हिंगोलीत सोमवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. लातूर शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे..Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाला पोषक वातावरण; राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज.यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोंदरी, वाकण परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. गोंदियातील गोरेगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याची पोती पावसाने भिजली आहेत. येथे तूर, सोयाबीन धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे..Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान.हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसचे ढगाळ हवामानाचाही अंदाज देण्यात आला आहे..उद्या सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ हवानासह काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ उतार राहू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.