Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे १२२ कोटींचे नुकसान

Heavy Rain News : जुलै अखेरीस झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ४७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात झाले आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जुलै अखेरीस झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ४७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात झाले आहे. शिरोळ तालुक्यातील बारा हजार हेक्टर पिकांना फटका बसला आहे. पंचनामे आणि अहवाल अंतिम टप्प्यात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष भरपाईकडे लागले आहे.

महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या चार नदीकाठावरील गावांतील पिकांचा यात समावेश आहे. जुलै महिन्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या चार नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी व ओढ्याच्या काठासह सुमारे बारा हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान ऊस व भाजीपाल्याचे आहे.

Heavy Rain
Kolhapur Flood : कोल्हापुरात नद्यांचे पाणी पात्राबाहेर

तालुक्यात कोबी, फ्लॉवर, मिरची, दोडका यासह अन्य पिकांचे व नवीन ऊस लागण केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये नांदणी, शिरढोण, टाकवडे, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरूंदवाड, खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, सैनिक टाकळी, दानवाड, दत्तवाड, उदगांव, शिरोळ, घालवाड, कुटवाड, हसूर, शिरटी, दानोळी, कवठेसार, कोथळी, उमळवाड, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, बस्तवाड, मजरेवाडी यासह अन्य गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Heavy Rain
Kolhapur Flood : वैभवशाली पंचगंगा काठाला सुतकी कळा

गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी महसूल विभागाकडून शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. या बाबतचा सर्व अहवाल कृषी विभाग, महसुल विभागाकडून वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील नदी काठावरील अनेक गावांना महापुराचा फटका बसला. अनेकांच्या घरात पुराचे पाणी आले. अनेकांच्या वस्तीला महापुराचा वेढा पडल्याने तालुक्यातील ६८४ कुटुंबे स्थलांतरित झाली होती. ही कुटुंबे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्याची स्थिती

जिल्ह्यात जिरायती पिके ७५०० हेक्टर बागायती पिकांचे ४०,३०० हेक्टर तर फळबागा पिकांचे ३७ हेक्टर वरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पावसाने जिल्ह्यात १,६२,८०० शेतकऱ्यांचे ४७,८९१ हेक्टर क्षेत्रावरील १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात १० हजार हेक्टर आणि हातकणंगले तालुक्यात ९५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. करवीर ७,६८७, कागल २,४५३, राधानगरी १,४७८, गगनबावडा १,२९७, पन्हाळा ५,९२४, शाहूवाडी ४,६७३, गडहिंग्लज ८०७, आजरा ३६१, चंदगड २,३०९, भुदरगड १०९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com